शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेघरांना हक्काची घरं..!

By admin | Updated: November 9, 2014 00:43 IST

रमाई आवास : ३८५ जणांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर

रत्नागिरी : जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील गरीब व दारिद्यरेषेखालील बेघरांसाठी ३८५ लोकांना रमाई आवास योजनेतून घरकुलांचा आधार देण्यात येत आहे़ त्यासाठी ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये अनुदान खर्च करण्यात येत आहे़ ग्रामीण भागामध्ये आजही हजारो कुटुंबीय बेघर आहेत तर अनेक कुटुंबिय मातीच्या भिंती असलेल्या मोडकळीस आलेल्या घरात गरीबीत दिवस काढत आहेत़ अशा कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना सुरु केली़ त्या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतो़ यंदाही या योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थींना दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील बेघराकडून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रस्ताव मागविले होते़ गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केले होते़ जिल्ह्यासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ५५० घरकुलांचे उद्दिष्ट होते़ त्यापैकी ३८५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची स्वत:च्या मालकीची किंवा संमत्तीने घेतलेली जागा आवश्यक आहे़ तसेच या घरकुलासाठी शौचालयाची सोयही करण्यात यावी. घरकुलापर्यंत जाण्यासाठी पायवाट किंवा पर्यायी रस्त्याची सोय असणे अवश्यक आहे, या अटी व शर्थींवर लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे़ या घरकुलांसाठी ९५ हजार रुपये देण्यात येणार आहेत़ या लाभार्थ्यांना ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे़ मंजूर करण्यात आलेल्या ३८५ घरकुलांवर ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत़ त्यासाठी पंचायत समित्यांना घरकुलांची रक्कम अदा करण्यात आली आहे़ रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३८५ गरीब व दारिद्यरेषेखालील कुटुंबियांना या लाभ देण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)