खेड : युवासेनेतर्फे आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या संकल्पनेतून दि. १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणपती सजावटीचे फोटो, नाव व पत्ता यांच्यासह सिद्धेश खेडेकर, दर्शन महाजन, राकेश सागवेकर, प्रसाद पाटणे, सौरभ चाळके यांच्याकडे स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी. फोटो व माहिती दि. १८ पर्यंत पोहोचतील असे पाहावे. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार १ रुपये, तीन हजार १ रुपये व दोन हजार १ रुपये सन्मानचिन्हासोबत देण्यात येणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील गणेशभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेतर्फे करण्यात आले आहे.