शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी शिक्षकांनी एकत्र येण्याची गरज : जोशी

By admin | Updated: December 16, 2014 00:20 IST

महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे.

चिपळूण : राज्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या हिंदी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात राज्य शासनाकडून वारंवार बदल करून समस्या निर्माण केल्या जात आहेत. त्याच्या निवारणार्थ सर्व हिंदी शिक्षक, हिंदी प्राध्यापक, हिंदीप्रेमी साहित्यिक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने त्रिभाषा सुत्रांचा स्वीकार केला आहे. मराठी प्रथम भाषा ६ तासिका, हिंदी द्वितीय भाषा ४ तासिका, इंग्रजी तृतीय भाषा ८ तासिका आहेत. मराठी १०० अंक, हिंदी द्वितीय भाषा १०० अंक, इंग्रजी तृतीय भाषा १०० अंक, समान भाषा, समान अंक, समान तासिका अभ्यासक्रमात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने यापूर्वी अनेकवेळा निवेदन देऊन १ लाख सह्यांचे अभियान, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद अध्यक्षांची पत्र व प्रस्ताव, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे संचालक प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांना पाठविली आहेत.राज्य शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरु केला आहे. या भाषेला ८ तासिका परंतु, हिंदी द्वितीय भाषा केवळ चार तासिका, महाराष्ट्रातील हिंदी शिक्षकांना जादा तास घेऊन काम करावे लागते. पहिलीपासून राज्य शासनाने हिंदी विषय सुरु केला पाहिजे. ते म्हणाले, दहावीसाठी राज्य शासनाने व्यवसायाभिमुख शिक्षण, शालेय अभ्यासक्रमात नवीन विषय द्वितीय किंवा तृतीय भाषेऐवजी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही भाषा विषयांवर अन्याय नको. व्यवसायाभिमुख शिक्षणाचा स्वतंत्र विषय समाविष्ट करण्यात यावा. अकरावी, बारावी उच्च माध्यमिक स्तरावर मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषय कायम ठेवण्याचे धोरण राज्य शासन अमलात आणत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे हिंदी द्वितीय भाषेवर अन्याय होत आहे. हिंदी राष्ट्रभाषा असून, त्या भाषेचा व या भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी सन्मान वाढविण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याची वृत्ती योग्य नसून सर्वांनी एकत्र यावे. (प्रतिनिधी)