शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण लांबणीवर?

By admin | Updated: December 25, 2016 23:34 IST

भूसंपादन रेंगाळले : मार्चनंतर काम सुरू होण्याची शक्यता

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या आरंभाचा डिसेंबर २०१६ मधील मुहूर्त हुकला आहे. भूसंपादनाची रेंगाळलेली प्रक्रिया व जमीन मालकांची नुकसानभरपाई देण्यास झालेल्या विलंबामुळे मार्च २०१७ पर्यंत चौपदरीकरणाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी गेल्या दोन दशकांपासून केली जात होती. २०१३मध्ये या चौपदरीकरणाच्या कामातील दोन टप्प्यांना मान्यता मिळाली. त्यानंतरही हा प्रकल्प रेंगाळणार अशी चिन्हे होती. परंतु केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय प्राधान्याने पुढे आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला गती दिली. महामार्ग चौपदरीकरण ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून उभारण्याची घोषणा त्यांनी रत्नागिरीत दोन वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली. चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. हरकतींवर सुनावणीही घेण्यात आली. महामार्गावरील काही भागात असलेल्या भूसंपादनातील समस्यांवरही गेल्या काही दिवसांत मात करण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाला यश आले आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून जमीनमालकांना त्यांची नुकसानभरपाई दिल्यानंतरच प्रत्यक्ष कामाचा आरंभ डिसेंबर २०१६मध्ये होणार असल्याची घोषणा खासदार विनायक राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती. आता डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे २०१६चा मुहूर्त हुकला आहे. महामार्ग विभागाकडे चौपदरीकरण कामाबाबत माहिती घेतली असता भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात आले. संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीनमालकांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या प्रक्रियेला अजून दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू व्हावे व खड्डेमय महामार्गावरून होत असलेली वाहनांची फरफट दूर व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. हजारो कोटींची मिळणार भरपाई रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीनमालकांना सुमारे दीड हजार कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला म्हणून सुमारे ५ हजार कोटींची भरपाई द्यावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, भरपाईची घोषणा अद्यापही झालेली नाही. इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्सच्या चौपदरीकरण कामाला ४ जून २०१३, ६ जून २०१३ व २१ जून २०१३ अन्वये मान्यता.प्रथम चार टप्प्यात होणारे चौपदरीकरण काम आता सहा टप्प्यात एकाचवेळी सुरू होणार. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण जागेचा सर्वे पूर्ण. चौपदरीकरणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १८९ गावांतील जमिनीचा समावेश. संगमेश्वर, पाली, लांजासह अनेक बाजारपेठांमधून उड्डाणपूल उभारले जाणार.