शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधी लागवड; शून्य टक्के प्रतिसाद

By admin | Updated: April 5, 2016 00:51 IST

कृषी विभाग : जिल्ह््यातून एकही प्रस्ताव नाही

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे गेली तीन वर्षे वनौषधी लागवड योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेसाठी जिल्ह््यातून एकही प्रस्ताव शेतकऱ्यांनी पाठविलेला नाही. केंद्र शासनाच्या आयुष विभागातर्फे औषधी वनस्पती लागवडीसाठी करोडो रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. लागवडीची पध्दत व उपलब्ध बाजारपेठ याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे या योजनेला आत्तापर्यंत शून्य टक्के प्रतिसाद लाभला आहे. राष्ट्रीय आयुष अभियान योजनेंतर्गत राज्यात वनौषधी लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याला ३७३ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. सर्व जिल्ह््यांकडून प्राप्त होणाऱ्या आराखड्यानुसार राज्याचा आराखडा तयार होणार आहे. गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह््यात एकाही शेतकऱ्याने वनौषधी लागवडीसाठी प्रस्ताव पाठविलेला नाही. त्यामुळे जिल्ह््याचा अद्याप आराखडाच तयार केलेला नाही. भाजप शासनाने वनौषधी लागवडीवर विशेष भर दिला आहे. परंतु, जिल्ह््यात कोणत्या प्रकारची वनौषधी लागवड केली जावू शकते, याबद्दल शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक कोणतीही योजना राबवित असताना शासनाने दिलेल्या निकषांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे या योजनेसाठी घालण्यात आलेली जागेची, बाजारपेठेची अट शेतकऱ्यांना जाचक ठरत आहे. उत्पादित वनौषधींची विक्री नेमकी कोणाला करायची, वनौषधी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नेमका किती नफा होईल याबाबतही शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेप्रमाणे ५४ प्रकारच्या वनौषधींची लागवड केली जावू शकते. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ व खासगी वनौषधी रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली जावू शकतात. त्यामुळे या योजनेंतर्गत वनौषधी लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) जागृतीच नाही : शेतकरी अनभिज्ञच वनौषधीच्या लागवडीसाठी शासनाकडून योजना तयार करण्यात आली. मात्र, ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. अनेक शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नसल्याने प्रतिसाद कमी मिळाला आहे. लागवडीला चालना राज्याला ३७२ कोटींचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. या निधीतून अनेक वनौषधी पु्न्हा मूळ घेऊ शकतात.