शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रक्तपेढीच्या मदतीला धावले हेल्पिंग हॅंडस; बुधवारी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या विविध रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. या शासकीय रक्तपेढीवर असंख्य रुग्ण अवलंबून असल्याने रक्ताची ...

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या विविध रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. या शासकीय रक्तपेढीवर असंख्य रुग्ण अवलंबून असल्याने रक्ताची टंचाइ जाणवू लागताच हेल्पिंग हॅंडस फोरममधील सर्व संस्था पुन्हा एकवटल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून बुधवार, ८ सप्टेंबर रोजी शहरातील जयस्तंभ भागातील गीताभवन येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दात्यांची संख्या घटली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया, प्रसूती, थॅलेसिमिया, हिमोफिलीया रुग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रुग्ण आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.

सध्या या रुग्णालयात विविध साथींच्या आजारांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसूती, डायलिसीस रुग्ण तसेच सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने त्यांनाही प्लेटलेट्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने दात्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या वाढलेल्या लसीकरणाचा परिणामही रक्त संकलनावर होत आहे. त्यामुळे रक्तपेढीत रक्त संकलन घटले आहे. रक्तपेढीतील रक्ताची गरज लक्षात घेऊन पुन्हा हेल्पिंग हॅंडस मदतीसाठी पुढे आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विचारातून हा फोरम निर्माण झाला. २०१९ मध्ये कोल्हापूर सांगली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यावेळी रत्नागिरीतून मदतीचे अनेक हात पुढे आले होते. यातूनच हेल्पिंग हेल्पिंग हँडस ही संकल्पना पुढे आली. जवळजवळ २८ संघटना एकत्रित येऊन हेल्पिंग हँड्स कार्य सुरू झाले. २०१९ च्या पूरग्रस्तांच्या मदतीपासून सातत्याने समाजाभिमुख मदती करता हेल्पिंग हँड्स काम करू लागली. त्यानंतर जवळपास गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मदत करणे, लसीकरण केंद्रावर मदत करणे, लॉकडाऊन काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, गेल्यावर्षी दापोलीत झालेल्या तौक्ते वादळावेळी या ठिकाणी जाऊन त्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांना मदत करणे, आत्ताच चिपळूण या ठिकाणी आलेल्या महापुरामध्ये नागरिकांना/ पूरग्रस्तांना मदत आणि बचाव कार्य करण्याचे काम असे अनेक उपक्रम अव्याहतपणे सुरू आहेत. अर्थात यासाठी प्रशासनाचे सहकार्य वेळोवेळी लाभलेले आहे.

सध्या शासकीय रक्तपेढीसाठी रक्तसंकलनाची गरज लक्षात घेउन ‘हेल्पिंग हँड्स’ द्वारे बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन हेल्पिंग हँड्स कडून करण्यात येत आहे. नोंदणीसाठी श्रीवल्लभ वणजू, कुणाल शेरे, श्यामल शेठ यांच्याकडे संपर्क करावा.