शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

खेड : जुलै महिन्यात आलेल्या महापुरामध्ये खेडमधील अनेक घरे, दुकाने तसेच जुन्या शाळांची दुरवस्था झाली आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी, नवनगर ...

खेड : जुलै महिन्यात आलेल्या महापुरामध्ये खेडमधील अनेक घरे, दुकाने तसेच जुन्या शाळांची दुरवस्था झाली आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी, नवनगर विद्यालय, निगडी पुणे या शाळेच्या मैत्री ८९ या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपने खेडमधील दोन नुकसानग्रस्त शाळांना वस्तूरूपाने मदतीचा हात दिला आहे.

शिक्षकांचा गौरव

देवरुख : शिक्षकांचा गौरव करण्यासाठी थँक अ टिचर हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह सााजरा करण्यात येणार असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित केले आहे.

पूरग्रस्तांना मदत

सावर्डे : मुंबई येथील बॅक बे आगाराच्या टिमने चिपळूण पूरग्रस्तांना सामाजिक भावनेतून मदतीचा हात पुढे केला आहे. या पूरग्रस्तांसाठी किराणा, जिन्नस, कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण या आगाराचे शरद पालकर, विजय दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंकरवाडी, पेठमाप, पोसरे, उक्ताड आदी भागात केले.

इंधनदरात कपात

रत्नागिरी : पेट्रोल, डिझेलच्या दरात १५ पैशांची कपात झाली आहे. रविवारी झालेल्या या दर कपातीने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने १५ पैशांची कपात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली आहे. पेट्रोल १०७ रुपये तर डिझेल ९६ रुपये लीटर झाले आहे.

विद्यार्थी गुणवत्ता यादी

लांजा : महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षा २०२०-२१ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये लांजा तालुक्यातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज हर्चेचे २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. पार्थ सकपाळ जिल्ह्यात प्रथम, अत्तदीप पवार चौथा आला आहे.

पाणी योजनेचे भूमिपूजन

गुहागर : तालुक्यातील काजुर्ली, गावठाण, बौद्धवाडी येथे मंजूर झालेल्या पाण्याची टाकी बांधणे व नळपाणी पुरवठा योजना तयार करणे या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत हे काम आहे. या योजनेमुळे आता या भागातील लोकांची पाणीटंचाई समस्या दूर होणार आहे.

दरडमुक्त सह्याद्री अभियान

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथे दरड कोसळणे या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून दरडमुक्त सह्याद्री या उपक्रमांतर्गत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा अतिवृष्टीमुळे जागोजागी दरड कोसळण्याचे प्रकार घडले. या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या दृष्टीने सृष्टी ज्ञान संस्था, मुंबई आणि देवरुख येथील संकल्प सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंगवलीत ही परिषद घेण्यात आली.

चाकरमान्यांचे आगमन

मंडणगड : यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा केला जाणार असला तरीही गणेशभक्त हा उत्सव साजरा करण्याकरिता आतूर झाले आहेत. तीन दिवसांवर आलेल्या या उत्सवासाठी आता चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा वर्दळ वाढली आहे.

एनएमएमएस परीक्षेत यश

दापोली : तालुक्यातील वाकवली येथील विश्राम रामजी घोले हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले आहे. या परीक्षेत २३ विद्यार्थी बसले होते. यापैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य एम. ए. पाटील, पर्यवेक्षक एस. के. पाटील यांनी कौतुक केले आहे.

महामार्गाची दुर्दशा

साखरपा : रत्नागिरी कोल्हापूर मार्गाची पुन्हा सुरू झालेल्या पावसाने अधिकच दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून साईडपट्ट्यांवर गवत वाढले आहे. तसेच गटारांमध्ये झाडेझुडपे वाढल्याने वाहनचालकांना कसरत करतच प्रवास करावा लागत आहे. सध्या गणेशोत्सवात या मार्गावर वर्दळ वाढली असल्याने या दुर्दशेमुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.