शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी वित्तहानी करून पावसाची रजा

By admin | Updated: September 25, 2016 23:01 IST

खेडमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर : स्वच्छतेचे काम सुरु; मुंबई-गोवा महामार्ग ठप्पच

रत्नागिरी : गेल्या दहा दिवसात अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने नागरिकांना हायसे वाटले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्याच्या अनेक भागात मोठी वित्तहानी झाली असून, खेड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे आता जिल्हावासी सावरू लागले आहेत. मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओल्या दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाचे पहिले ९ दिवस अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे उत्सवप्रेमींमध्येही समाधान होते. मात्र, त्यानंतर पावसाने जिल्ह्यावर संततधार धरली होती. मात्र, हा पाऊस जोराचा नव्हता. परंतु, गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. चिपळूण व खेड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी भरले. चिपळूण शहरातही पाणी भरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चिपळूणमधील पुराचे संकट दूर झाले. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी भरल्याने त्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाशी या गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, रविवारी पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतली. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपाची रिमझिम झाली. पावसाच्या विश्रांतीमुळे नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जिल्हा आता या संकटातून सावरू लागला आहे. (प्रतिनिधी) ४तब्बल नऊ दिवसानंतर अथक बरसणाऱ्या पावसाची विश्रांती. नागरिकांनी सोडला नि:श्वास. खेड तालुक्याला सर्वाधिक फटका. खेडसह चिपळूणमधील जनजीवन पूर्वपदावर. जिल्ह््यात शेतीचे मोठे नुकसान. ओला दुष्काळ पडण्याची भीती. चिपळूण, खेडमध्ये अनेक ठिकाणी भरलेले पाणी ओसरले. खेडमध्ये ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेले. बस पडल्या अडकून. नद्या, नाल्यांना आलेला पूर ओसरला. नुकसानीचे पंचनामे सुरु.