शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी सध्या पाऊस सरींवर पडत आहे. अधूनमधून थोडीशी विश्रांती घेत सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून, ३९० मिलिमीटर (सरासरी ४३.३३ मिलिमीटर) एकूण पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, दापोली पाजपंढरी येथे भागवत पावसे यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोली येथील काशिनाथ जाधव यांच्या घराचे अंशत: चार हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसोश्वर येथील बाळाराम डेवणकर यांच्या घराचे पावसामुळे तीन हजार ९५० एवढे नुकसान झाले आहे. शिरसोली येथे दिनकर जाधव यांच्या घराचे एक हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरसाडी येथील वसंत वाजे यांच्या घराचे अंशत: दोन हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे. गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांच्या घराचे अंशत: आठ हजार ४५० रुपये नुकसान झाले आहे. माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: चार हजार ५०० रुपये नुकसान झाले आहे.

चिपळूण तालुक्यात कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ती हटविण्याचे काम चालू आहे. पर्यायी आकळे-कादवड-तिवरे रस्ता चालू आहे. टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: २४ हजार रुपये नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात पडवे येथील शमशाद शिरगावकर यांच्या घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. अडूर येथील सुरेश रसाळ यांच्या घराचे अंशत: २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. पडवे येथील कैसर शिरगाव यांच्या घराचे अंशत: नऊ हजार रुपये नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांचे घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: पाच हजार ४०० रुपये नुकसान झाले आहे. देवळे बौद्धवाडी येथील सिद्धार्थ पवार यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तुळसणी येथील जलऊदीन अस्ली बोट यांच्या पक्क्या विहिरीचे अंशत: एक लाख ५० हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. तुळसणी येथील ग्रामपंचायतीजवळील मोरीचे पावसामुळे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सध्या पावसाचा जोर असला तरी पावसाची संततधार थांबली आहे. शुक्रवारी दिवसभर पाऊस सरींवर कोसळत होता. या पावसाने तापमान खाली आले असून वातावरणात गारवा आला आहे.