शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ढीगभर अभियाने, प्रवासीसंख्या मात्र होतेय ऊणे

By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST

गळक्या गाड्या, फुटक्या काचा... : समस्या घेऊन एस. टी. ‘प्रवासी वाढवा’ची सत्वपरीक्षा

उमेश पाटणकर - रत्नागिरी ,, जेमतेम वीस प्रवासी घेऊन चढावात लिलया मागे टाकून एखादा ट्रकचालकही सहज निघून जातो. खिडक्यांमधून पावसाचे पाणी आत येतेय म्हणून सरकून मध्ये बसावे तर डोक्यावर हमखास पाणी गळतेय, अशी परिस्थिती असणारी वाहने दिमतीला घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग प्रवासी वाढवा अभियान सुरु करीत आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, वाहनांच्या सुट्या पार्टची कमतरता, दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि वारंवार कोलमडणारे वेळापत्रक यामध्ये हे अभियान वरिष्ठ अधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा घेणार आहे.दरवर्षी दि. १ आॅगस्टला एस. टी.चे प्रवासी वाढवा अभियान सुरु होते. याची तयारी किमान पंधरा दिवस आधी होते. राज्य मार्ग परिवहनचा रत्नागिरी विभाग प्रतिवर्षी जय्यत तयारीनिशी यात सहभागी होतो. मात्र, यंदाचे अभियान एस. टी.चे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी या सर्वांची सत्वपरीक्षा घेणारे ठरणार आहे. गाड्यांच्या दुरुस्तीचे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचा एस. टी. कर्मचाऱ्यांचा दावा आहे. त्याचा फटका चालक. वाहकांना बसत आहे. अगदी काचेचाच प्रश्न घ्यावा म्हटला तरी रत्नागिरी आगारात किमान चार ते पाच गाड्या अशा आहेत की, ज्यांच्या विन्डोग्लास विविध कारणांनी फुटलेल्या आहेत. पावसात अशा फुटक्या काचांच्या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. परिवर्तन प्रकारातील बसेस बसेसना भली मोठी अखड विन्डग्लास वापरली गेली आहे. यातील एका बसची काच वरपासून खालपर्यंत अखंड फुटली आहे. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून प्लास्टिक टेप लावून चिकटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रवासादरम्यान बसणाऱ्या हादऱ्यांमुळे फुटलेली ही काच रबरामधून सरकली असून, केव्हाही निसटण्याची शक्यता आहे., अशी या बसची अवस्था असल्याचे दिसून येते.अतिवेगाने अपघात होतात म्हणून एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी सर्वच गाड्या स्पीडलॉक केल्या आहेत. यासाठी अ‍ॅक्सिलेटर पायडलखाली जाडे नटबोल्ट चक्क वेल्डिंग करुन कायमस्वरुपी बसवले आहेत. यामुळे बसेसना पुरेशी गती मिळेनाशी झाली आहे. गाडी रिकामी असली तरी लहान सहान चढावात स्पेशल गिअरचा वापर करावा लागतो.गाड्यांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने वर्कशॉपमधून आलेली गाडी अनेकदा पहिल्याच पावसात नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचाही खोळंबा होत असल्याचे दृश्य जागोजागी दिसत आहे. त्यामुळे कर्मचारीही हतबल झाले आहेत.