चिपळूण : शहरातील खाटीक गल्ली येथील युवकाला अंघोळीसाठी बादलीत टाकलेल्या हिटरचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत रात्री उशिरा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली. अरफाक कुरेशी (१५) असे त्याचे नाव आहे.
अरफाक कुरेशी हा अंघोळीसाठी गेला हाेता. त्याने पाणी गरम झाले का हे पाहण्यासाठी हिटर टाकलेल्या पाण्याच्या बादलीत हात टाकला. त्यामध्ये त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तो मृत झाल्याचे सांगितले. अरफाक हा गतवर्षी दहावी परीक्षा पास झाला होता. तसेच त्याच्या पश्चात आई, वडील व दोन, भाऊ असा परिवार आहे.