विसर्जनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच दिवस भक्तीभावाने पूजा अर्चा केल्यानंतर गौरी गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी शास्त्री व सोनवी बावनदी किनाऱ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसापूर्वी ७ हजार गणपतींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेश भक्तांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
देवरुख पोलीस स्थानक हद्दीतील सुमारे सात हजार दोनशे गणरायाचे विसर्जन शांततेत झाले. देवरुख सप्तलिंगी नदी येथे घाटावर ठिकठिकाणी देवरुखवासीयांनी, तर साखरपा, देवडे परिसरातील लोकांनी काजळी, बावनदी पात्रात, आरवली-माखजनवासीयांनी गडनदी, असावी नदी याबरोबरच बुरंबीवासीयांनी सोनवी, सोनवडे, वाशी, फणसवळे परिसरातील भाविकांनी गडगडी नदी पात्रात विसर्जन केले.
मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे कोणतेही विघ्न न येता विसर्जन पार पडले.
फोटो मेल केले आहेत.(दोन मेल आहेत. संगमेश्वरातील फोटो आणि देवरूखातील फोटो)