शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कॅन्सरशी झगडतच तो ‘वडिलां’कडे गेला!

By admin | Updated: December 14, 2014 00:06 IST

खाडीभागातील दुर्दैवी घटना : पितापुत्राच्या मृत्यूने सारेच हळहळले...

एजाज पटेल, फुणगूस : मुलाच्या सतत आजारपणाचा धसका घेत वडिलांनी देह ठेवला अन् वडिलांच्या मृत्यूचे ओेझे मनावर घेत दुर्धर आजाराने पीडित असलेल्या त्या मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दीड महिन्यात प्राण सोडले. फुणगूस खाडीभागात झालेल्या या घटनेने अवघा खाडीभाग शोकसागरात बुडाला असून, येथील नवजीवन विद्यालयाने एक दिवसाची सुट्टी जाहीर करत आपल्या या विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण केली.‘किस्मत के खेल है ये मेरे भैय्या’ हे सत्य ठरलंय संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावात..! येथील विजय देवळेकर हे अत्यंत गरिबीत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. पत्नी, दोन मुली आणि गोंडस असा वैभव असे छोटेसे कुटुंब. मात्र घरात अठरा विश्व दारिद्र्य असतानाच नियतीने या कुटुंबाला पहिला धक्का दिला. शालेय शिक्षण घेत असलेल्या वैभवला आजाराने घेरले. सुरुवातीला हलका असणारा ताप वाढत गेला. उपचाराकरिता मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागली. अखेर वैभवला कॅन्सरसारखा दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याचे वडील हादररुनच गेले.आधीच गरीबी आणि त्यामध्ये एकच मुलगा. वैभवला कॅन्सरसारखा आजार पाहून साहजिकच वडील विजय देवळेकरांना प्रचंड धक्का बसला. वैभवचे आजारपण त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करुन गेले. अशातही मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी वैभववर उपचार सुरु ठेवले. दुसऱ्या बाजूला वैभव नवजीवन विद्यालय फुणगूस येथे शिक्षणही घेत होता. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत तो शिक्षणावर प्रेम करत होता. अशावेळी नियतीने दुसरा घाला घातला. मुलाच्या आजाराचा धसका घेतलेले विजय देवळेकर दीड महिन्यापूर्वी या जगाचा निरोप घेत निघून गेले. देवळेकर कुटुंबावर जणू आभाळ कोसळले.वडिलांच्या मृत्यूने कॅन्सर पीडित वैभव पुरता खचला. मात्र आपल्यावरची जबाबदारी ओळखून न डगमगता धैर्याने उभा राहिला. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत छोटीमोठी कामे तो करत असे आणि ११ वाजता शाळेत जात असे. परत सायंकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा बाजारपेठेत व्यावसायिकांना मदत करुन अंधार पडताच घरी जात असे. बाजारपेठेत तो सर्वांचाच लाडका बनला होता. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला कॅन्सरसारखा भयानक आजार आहे, हे मुळीच पटत नव्हते इतकी कडवी झुंज तो कॅन्सरशी देत होता.वडिलांच्या मृत्यूचे ओझे घेऊन कॅन्सरसारख्या भयानक आजाराला वैभव देत असलेली झुंज नियतीला पाहवली नाही आणि शुक्रवारी सायंकाळी नियतीने थेट वैभववरच घाला घातला. वैभवची कॅन्सरशी असलेली झुंज अपयशी ठरली. वैभव आणि यमदुताच्या या लढाईत यमदूताचा विजय झाला असला तरी खऱ्या अर्थाने या गोंडस मुलाने दिलेली झुंज पाहता खऱ्या अर्थाने वैभवने यमावर मात केली असेच म्हणावे लागेल. वैभवच्या मृत्यूचे वृत्त खाडीभागात समजताच अवघ्या खाडीभागावर शोककळा पसरली. ज्या नवजीवन विद्यालयात तो शिक्षण घेत होता, त्या शाळेला आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नवजीवन विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच फुणगूस बाजारपेठेतील व्यापारी यांच्यासह शेकडोजण वैभवच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. साऱ्यांनी वैभवला जड अंतकरणाने निरोप दिला. (वार्ताहर)