शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

१८ वर्षांचा खंड पडूनही तो जिद्दीने झाला दहावी उत्तीर्ण

By admin | Updated: June 22, 2017 01:08 IST

गतिमंद मुलाचा आदर्श : प्रोत्साहनाला कष्ट अन् मानसिकतेची जोड; आर्थिक दुर्बल तरीही शेवटपर्यंत न डगमगता लढत

शोभना कांबळे; लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिकण्याची जिद्द असली की प्रयत्नाने यश मिळविता येते, हे ओंकार रामदास डाफळे या गतिमंद मुलाने दाखवून दिले आहे. १८ वर्षांचा खंड पडूनही त्याने हे यश मिळविले. यात त्याच्यासाठी परिश्रम घेणाऱ्या रामकृष्ण सुर्वे अभ्यासवर्गाचा महत्वपूर्ण वाटा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारी मुले शिक्षण सोडून रोजगार मिळवण्यासाठी घराबाहेर पडतात, तर काही मुले शाळा सोडून देतात. पण, त्यांच्या मनात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असते. अशा मुलांसाठी स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष जितेंद्र शिवगण, निवृत्त शिक्षक नाना मुझुमदार आणि सामाजिक कार्यकर्ते संजीव सुर्वे यांच्या प्रयत्नांतून गेल्या अनेक वर्षांपासून कै. रामकृष्ण सुर्वे अभ्यासवर्ग सुरू आहे. या अभ्यासवर्गात १७ नंबरचा अर्ज भरून मुलांना दहावी परीक्षेला बसवले जाते. या अभ्यासवर्गात येऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या अनेक मुलांना पुढे शिक्षणाच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मंडळाचे कार्यकर्ते तसेच निवृत्त शिक्षक नाना मुझुमदार हे स्वत: या मुलांना मार्गदर्शन करतात, ते कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. शहरातील फगरवठार येथे राहणारा आर्थिक दुर्बल घटकांतील आेंकार डाफळे या वर्गात दाखल झाला. गतिमंद असल्याने तो या वर्गात वेगळा वाटत होता. मात्र, मंडळाच्या या केंद्रातील कार्यकर्ते सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, जितेंद्र शिवगण यांनी त्याला प्रोत्साहीत केले. शिक्षणात मध्यंतरी १८ वर्षांचा खंड पडल्याने त्याला शिकविणे, ही या मंडळींसाठी कसोटीच होती. मध्येच ओंकार आजारीही पडला. त्यामुळे त्याच्या घरच्या मंडळींना आपण त्याला शिक्षणासाठी एवढ्या उशिराने पाठविले, ही चूक केली, असे काही काळ वाटू लागले. त्यांनी या शिक्षकांकडेही तसा राग व्यक्त केला. पण ओंकार स्वत: शिक्षणाबाबत सकारात्मक होता. अखेर या मंडळासोबत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा चौधरी यांनी त्याच्या वडिलांना बोलावून समजूत काढली आणि त्यांच्या या परिश्रमाला यश आले. १८ वर्षांनंतर परीक्षा देऊन ओंकार ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याचे आणि त्याच्यासाठी मेहनत घेणाऱ्या त्याच्या शिक्षकांचे श्रम सार्थकी लागले. यावर्षी रामकृष्ण सुर्वे या अभ्यासवर्गातील १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, सुवर्णा चौधरी, कुशल जाधव, अपेक्षा पाटील, सुविधा गाडेकर, पल्लवी पवार, अमोल जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. टर्बाईनच्या पार्टसाठी शोधमोहीम सुरु रत्नागिरी गॅस : चोरीनंतर टर्बाईनचा एक भाग अजूनही गायब लोकमत न्यूज नेटवर्क; गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील टर्बाईन चोरीनंतर टर्बाईनचा एक पार्ट अद्याप मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता गुहागर पोलीस, सीआयएसएफ व ग्रामस्थ अशी संयुक्त शोधमोहीम घेण्यात आली. वीजनिर्मिती करणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पात टर्बाईन पार्टची सहा महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. वीजनिर्मिती होणाऱ्या पॉवरब्लॉक बाहेरील भागात हे टर्बाईन दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले होते. त्याच कालावधीत चोरी झाली होती. सीआयएसएफचे सुरक्षाकवच भेदून ही चोरी झाल्याने प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी संबंधित चोरट्यांना काही दिवसात पकडले. चोरीनंतर टर्बाईनचा एक पार्ट पालपेणे तळ्याची वाडी येथील रस्त्याशेजारील भागात लपविला होता. मात्र, प्रत्यक्ष चोरीच्या उलगड्यानंतर या भागात हा पार्ट मिळाला नाही. यानंतर पोलीस व सीआयएसएफ यांनी शोधमोहीम घेतली होती. नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता पुन्हा शोधमोहीम घेतली. यावेळी १० पोलीस, सीआयएसएफचे २५ जवान व ग्रामस्थही यात सहभागी झाले होते. दीड तास शोध घेतल्यानंतरही काहीच मिळाले नाही. चोरी होऊन सहा महिन्यांनंतर अचानकपणे ही शोधमोहीम घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.