शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

कोकणात नागरी संरक्षण दलाचे कार्यालय कार्यरत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

- दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश - अन्य चार जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत लोकमत न्यूज नेटवर्क ...

- दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश

- अन्य चार जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नागरी संरक्षण दलाचे कार्यालय स्थापन करण्यास होणारी दिरंगाई आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कार्यालय स्थापन करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागणाऱ्या राज्य सरकारला धारेवर धरत मागील पाच वर्षांत वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच स्मरणपत्रे पाठवूनही त्याबाबत पूर्तता का केली नाही आणि आता आणखी वेळ कसला मागत आहात, अशा शब्दात खंडपीठाने राज्य सरकारचे कान टोचले. यावेळी दाेन आठवड्यात निर्णय घेण्याची सक्त सूचना न्यायालयाने केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील दोन्ही जिल्हे नैसर्गिक आपत्तींमुळे धोकादायक जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, या जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे कार्यालय नसल्याने ते स्थापन करण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका निवृत्त महसूल कर्मचारी शरद राऊळ यांच्यावतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी उच्च न्यायालयात दाखल करण्यात केली आहे. त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या सहा जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या नागरी संरक्षण दलाच्या मुख्यालयाने २०११ साली निर्णयही घेतला होता. त्यानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे केंद्र स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, संबंधित केंद्रासाठी लागणार्‍या अधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून अंतिम यादी मंजुरीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यालयात पाठवली आहे. जागेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयासाठीही जागा उपलब्ध करून दिल्या. नोकर भरतीही केली गेली. परंतु, अद्याप केंद्र स्थापन करण्यात आले नाही. अन्य चार जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत.

या दोन जिल्ह्यांसाठी नाहीत. वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यांना वादळाचा आणि पर्जन्यवृष्टीचा मोठा तडाखा बसला. पंधरा दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये आलेल्या पुरादरम्यान या जिल्ह्यांमध्ये कार्यालय नसल्याने नागरी संरक्षण दलाच्या जवानांना तेथे पोहोचण्यास दीड दिवसांचा अवधी लागला. याकडेही याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी लक्ष वेधले.

दुसरीकडे, दोन जिल्ह्यांना नागरी संरक्षण दलाची गरज नसल्याचे सांगणार्‍या राज्य सरकारने कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती खंडपीठाकडे केली. खंडपीठाने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आणि गृह विभागाच्या सचिवांनी संबंधित विभागाच्या परवानग्या घेऊन दोन आठवड्यात तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.