शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हर्दखळेचे पोलीस पाटील ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:02 IST

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर राष्टÑीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मेढे येथे कार झाडावर आदळून एकजण ठार तर दोघे जखमी झाले. जयवंत ...

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर राष्टÑीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मेढे येथे कार झाडावर आदळून एकजण ठार तर दोघे जखमी झाले. जयवंत पांचाळ (५०) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते लांजा तालुक्यातील हर्दखळे येथील पोलीस पाटील आहेत. पांचाळ यांचा मुलगा प्रणय आणि प्रकाश पाटील हे हर्दखळे येथील शिक्षक गंभीर जखमी आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेढे बसथांब्यापासून काही अंतरावर मारुती अल्टो ८०० गाडी (एमएच-१०-सीए-९१०४) ही गाडी आंब्याच्या झाडावर जोरदार आदळली. त्यात हर्दखळे येथील पोलीस पाटील जयवंत पांचाळ हे जागीच ठार झाले. प्रकाश दत्तू पाटील (५४) हे हर्दखळेमधील शिक्षक ही गाडी चालवत होते. त्यांच्यासह जयवंत पांचाळ यांचा मुलगा प्रणय पांचाळ (१०) या अपघातात जखमी झाले. हे सर्वजण इस्लामपूर येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते तेथून परत येत असताना हा अपघात झाला.अपघाताचे वृत्त समजताच मेढे ग्रामस्थांनी त्वरित धाव घेऊन गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जयवंत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. प्रकाश पाटील आणि प्रणय पांचाळ यांना उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. मात्र, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात आले.यावेळी कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे, मराठी पत्रकार संघाचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष संतोष पोटफोडे अनेकांनी जखमींना हलविण्यामध्ये पुढाकार घेतला. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.प्रकाश पाटील यांना कोल्हापूरला हलविलेप्रकाश पाटील यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूरला पाठविण्यात आले आहे. प्रणय रत्नागिरीत दाखल असून त्याची प्रकृती सुधारत आहे.