शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये हापूसचे दर चढेच; ग्राहकांची खरेदीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 17:16 IST

Mango Ratnagiri : गेल्या काही दिवसापासून हापूस आंबा तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी हापूस खरेदीकडे पाठच फिरवली आहे. सद्यस्थितीत छोट्या आकाराच्या फळांचा दर शेकडा २६०० रूपये आहे तर मोठ्या हापूसची तीन हजार रूपयांपर्यंत विक्री केली जात आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेतच आंबा विक्रेत्यांना बसण्याची मुभा देण्यात आल्याने हापूस खरेदीला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्देखेडमध्ये हापूसचे दर चढेचग्राहकांची खरेदीकडे पाठ

खेड : गेल्या काही दिवसापासून हापूस आंबा तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी हापूस खरेदीकडे पाठच फिरवली आहे. सद्यस्थितीत छोट्या आकाराच्या फळांचा दर शेकडा २६०० रूपये आहे तर मोठ्या हापूसची तीन हजार रूपयांपर्यंत विक्री केली जात आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेतच आंबा विक्रेत्यांना बसण्याची मुभा देण्यात आल्याने हापूस खरेदीला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. एसटी बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातून शहरात हापूसची विक्री करण्यासाठी जायचे कसे? असा प्रश्न आंबा विक्रेत्यांना सतावत आहे. काही आंबा विक्रेते खासगी वाहनांद्वारे आर्थिक भुर्दंड सहन करून हापूसची विक्री करण्यासाठी येथे दाखल होत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात असल्याने याचा फटका आंबा विक्रेत्यांना बसत आहे.

दहा दिवसापूर्वी हापूसचा दर शेकडा ४ हजार रूपये होता. मात्र, हापूसच्या दरात घसरण होऊन सद्यस्थितीत शेकडा ३ हजार रूपये दराने हापूस विकला जात आहे. मात्र, हा दर चढाच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. ३ हजार रूपये शेकडा दराने हापूस खरेदी करायचा कसा? असा प्रश्न देखील काहींना पडला आहे.शहरात शंकराच्या मंदिराजवळील मोकळ्या जागेत आंबा व्यावसायिकांना बसण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ निर्धारित केली आहे. यासाठी खाडीपट्यातून हापूस विक्रीसाठी येणारे आंबा व्यावसायिक पहाटे दाखल होत आहेत. मात्र, ग्राहकांअभावी आंबा व्यावसायिकांना तासनतास तिष्ठतच बसावे लागत आहे. त्यासाठी काही आंबा व्यावसायिकांनी दर कमी करून ग्राहकांना थेट घरपोच डिलिव्हरी करण्याची शक्कल लढवली आहे. 

टॅग्स :MangoआंबाKhedखेडRatnagiriरत्नागिरीMarketबाजार