शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

हापूसला हॉलंड बाजारपेठ खुली -५५० मेट्रिक टन हापूसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:14 IST

हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी आहे. गतवर्षीपासून युरोप, कॅनडा, रशिया येथूनही मागणी नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहा देशांच्या यादीत आणखी एकाचा समावेश

रत्नागिरी : हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी आहे. गतवर्षीपासून युरोप, कॅनडा, रशिया येथूनही मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच हॉलंडमधून हापूसची मागणी करण्यात आली आहे. ५०० टन हापूस आंब्याची मागणी हॉलंडने केली आहे.

प्रत्येक देशाच्या मागणीनुसार आंब्यावर प्रक्रिया करुन आंबा निर्यात केला जातो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्वाधिक आंबा हा मुंबईतील वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो. वाशी बाजारमधून  विविध देशांमध्ये हा आंबा निर्यात केला जातो. वाशी बाजारात पणन मंडळातर्फे नवीन रेडिएशन प्लान्ट उभारण्यातआला आहे. या प्लान्टमध्ये आंब्यावर उष्णजल, बाष्पजल प्रक्रिया करण्यात येते. रत्नागिरीतील हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रामध्ये उष्णजल प्रक्रिया करुन आंबा निर्यात करण्यात येतो. हॉलंड येथील पथकाने रत्नागिरीच्या आंबा निर्यात केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ५०० टन हापूसची मागणी नोंदवली आहे. 

यावर्षी आंबा कमी असताना त्याला परदेशातून मागणी वाढली आहे. शेतकºयांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी मँगोनेट सुविधा सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात मॅगोनेटद्वारे शेतकºयांनी परदेशात आंबा निर्यात केला होता. बहुतांश शेतकरी वाशी बाजारावर विसंबून असतात. वाशी बाजारात आंबा येण्याचे प्रमाण वाढले की, त्याचे दर कोसळतात. यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन कमी आहे.  उत्पादन कमी असूनही समाधानकारक दर नाही. त्यामुळे आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून काढणे शेतकºयांना कष्टदायक बनले आहे. हॉलंडने आपली बाजारपेठ खुली केली असल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे. परदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. कीटकनाशक रेसिड्यू फ्री असलेल्या आंब्याची निवड करण्यात येते. आंबा पिकावर हवामानामुळे होणारे परिणाम व रेसिड्यू फ्री कीटक नाशकांसाठी कृषी विद्यापीठातर्फे संशोधन होणे गरजेचे आहे.