शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेच्या उपचारांकरिता मदतीचा हात

By admin | Updated: September 26, 2016 23:15 IST

चाईल्ड लाईन : देवरूख येथील बालिकेसाठी मदतीचे आवाहन

रत्नागिरी : एम. एस. नाईक फाऊंडेशन संचलित, रत्नागिरी चाईल्ड लाईन १०९८ या संस्थेने जान्हवी मिलिंद जंगम (२ वर्षे, देवरूख - बोटकेवाडी, ता. संगमेश्वर) या मुलीच्या वैद्यकीय उपचाराकरिता मदतीचा हात दिल्याने तिच्यावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.चाईल्ड लाईनला मिळालेल्या माहितीवरून मुलीची चौकशी केली असता मुलीच्या उजव्या डोळ्याला कॅन्सर झाल्याने मुलीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून, या मुलीवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी ७० हजार रुपये एवढा खर्च डॉक्टरांमार्फत देण्यात आला असल्याचे पालकांकडून समजले. परंतु मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने एवढा खर्च करणे पालकांना शक्य नसल्याने त्यांच्याकडून चाईल्ड लाईनला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मुलीच्या पालकांना मुख्यमंत्री निधीतून वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरिता महेश जाधव यांच्या सहकार्याने ३५००० रुपयांचा निधी मंजूर करुन देण्यात आला. उर्वरित ३५ हजार जमा करण्याकरिता मुलीच्या वडिलांनी मदतीचे आवाहन केले. मुलीची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन चाईल्ड लाईनने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या दानशुरांना मुलीच्या उपचारांकरिता आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला रत्नागिरीकरांनी प्रतिसाद दिला. संपूर्ण रक्कम चाईल्ड लाईन केंद्रावर मुलीचे वडील मिलिंद जंगम यांच्याकडे देणगीदारांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी एम. एस. नाईक प्रशालेचे सेक्रेटरी अश्फाक नाईक, केंद्रसमन्वयक प्राची जाधव, टीम मेंबर त्रिपाली कोळंबेकर, नितीश शेट्ये, ओंकार नागवेकर, सतीश महाडिक, स्वयंसेवक अभिषेक भुते उपस्थित होते. एम. एस. नाईक फाऊंडेशनचे संचालक मोहंमद सिद्दीक नाईक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)