शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

गुहागरातील अपंगाचा भावंडांना आधार

By admin | Updated: July 16, 2015 00:32 IST

समीर पाटील : पोलिओतून सावरला अन् रिक्षा व्यावसायिक झाला...

मंदार गोयथळे -असगोली -घरची परिस्थिती बेताची. त्यातच बालपणी पोलिओच्या आघाताने जगण्याची उमेदच मोडली. पोलिओसारख्या आजारपणातच दोन्ही पाय गमावूनही त्याने केवळ जिद्दीच्या जोरावर रिक्षा व्यवसायात उडी घेतली. यावरच न थांबता दोन्ही लहान भावंडांना स्वत:च्या पायावर उभे केले, ही कथा आहे ती गुहागर तालुक्यातील तळवली येथील समीर पाटील या तरुणाची!मूळ गाव अडूर - कोंडकारुळ येथील ३२ वर्षीय समीर पाटीलची कहाणी फारच दु:खदायक आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य. असे असतानाच एक वर्ष पूर्ण होण्याआधीच समीरला पोलिओ झाला. ही घटना इतकी विचित्र होती की, पोलिओमध्ये अपंगत्व आल्याने तो आपले दोन्ही पाय गमावून बसला. आपण इतरांप्रमाणे उभे राहू शकणार नाही, याची कल्पना त्यावेळी त्याच्या बालमनाला आली नाही. मात्र, या घटनेनंतर त्याचे तळवली येथील दोन्ही मामा विनोद मयेकर व विवेक मयेकर हे त्याचे दोन पाय बनले.समीरच्या मामांनी त्याला न्यू इंग्लिश स्कूल, तळवली येथे दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. शरीराने अपंग असला तरी समीर मनाने खंबीर आहे. त्यामुळे त्याने अनेक मित्र जोडले. त्यापैकी ज्या मित्राने त्याला गाडी चालवण्याचे धडे दिले, त्या मित्राचे नाव तो आज फार कौतुकाने आणि कृतज्ञतेने आवर्जुन घेतो. अरुण कांबळे या मित्राने त्याला ड्रायव्हिंगचे धडे दिले. अपंग असूनही समीरने गाडी चालवण्याचे तंत्र आत्मसात करुन घेतले.भावंडात सर्वांत मोठा असल्याने घरची सर्वच जबाबदारी समीरवर होती. कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्नही समोर होता. तो सोडवण्यासाठी समीरने वाहन घेण्याचे ठरवले, यासाठी सर्वात मोठी अडचण भासत होती ती पैशांची! यावेळी पुन्हा एकदा मामांनी आधार देत सर्वतोपरी मदत केली. मामांनी समीरला रिक्षा घेऊन दिली. इथून समीरचा रिक्षा व्यवसाय सुरु झाला. कालांतराने त्याने अ‍ॅपे रिक्षा खरेदी केली. आता तर त्याचा या व्यवसायात इतका जमा बसलाय की, सध्या टाटा आयशर हे वाहन खरेदी करत त्याने या व्यवसायात भरारी घेतली आहे.तळवली येथे मामाकडे राहून समीर हा व्यवसाय करत आहे. समीरने दोन्ही लहान भावंडांनीही वाहन चालवण्याची कला आत्मसात केली आहे. समीरच्या या धडाडीमुळे आज त्याचा एक भाऊ एस. टी. महामंडळात चालक म्हणून नोकरी करत आहे.