शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटलाच्या बांधकामावर हातोडा

By admin | Updated: November 5, 2014 00:08 IST

वृषाली पाटील : अनधिकृत बांधकाम तोडले

चिपळूण : तालुक्यातील तनाली गावी तहसीलदार वृषाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी अनधिकृत बांधकामावर हातोडा उगारला. यामध्ये पोलीसपाटीलांसह तिघांची अनधिकृत बांधकामे तोडली. पोलिस पाटलांनीच केलेल्या या अनधिकृत बांधकामाची तनाली परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.तनाळी येथे सरकारी जमिनीत अनधिकृत घरे व बांधकामे केल्याची तक्रार तहसीलदार पाटील यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी पोलीसपाटील मोहन घनश्याम देवरुखकर, शरदचंद्र गजानन वैद्य, अनिल वैद्य यांना अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही या सूचनांचे पालन संबंधितांनी केले नाही. शासकीय जमिनीत हे बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. तसेच तहसिलदारांनी आदेश देऊनही त्यांनी हे बांधकाम हटवले नाही. अखेर ही बांधकामे प्रशासनातर्फे काढून टाकण्याचा निर्णय तहसीलदार पाटील यांनी घेतला. तहसीलदार पाटील आपले सहकारी निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मंडल अधिकारी संदीप गांगड या सर्कलमधील सर्व तलाठी यांच्यासह घटनास्थळी जाऊन केलेले बांधकाम जमीनदोस्त केले. तहसीलदारांनी सरकारी जागेत बांधलेले अनधिकृत घर तसेच दोघांच्या घराभोवतीचे कुंपण काढून टाकल्याने विशेष म्हणजे पोलिस पाटीलचे बांधकाम असूनही ते तोडल्याने तहसीलदार यांच्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. तालुक्यातील अन्य अनधिकृत बांधकामे अशीच काढून टाकावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)धडक कारवाई...पोलीसपाटलांसह अन्य दोघांच्या बांधकामांवरही केली कारवाई.तनाळी येथे सरकारी जमिनीत घरे व बांधकामे केल्याची तहसीलदारांकडे झाली होती तक्रार.नोटीस देऊनही बांधकाम न पाडल्याने तहसीलदारांची कारवाई.