शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जी ठेकेदार काळ्या यादीत

By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST

चिपळूण नगरपरिषद : ...अन्यथा आंदोलन

चिपळूण : शहरातील विविध विकासकामे गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, मुदतीत कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शहरात मटण, मच्छी मार्केट, महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडई त्याचप्रमाणे अन्य विविध विकासकामे अद्याप पूर्णत्त्वास गेलेली नाहीत. विकासकामांसाठी नगर परिषद प्रशासनातर्फे लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रलंबित कामांची प्रशासनाने दखल घ्यावी, या उद्देशाने मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांची भेट घेतली. यावेळी रविकांत काणेकर, राकेश घोरपडे, मुनाफ हमदुले, भाऊ भाटकर, किरण विचारे, बाबा कदम आदींसह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ज्या ठेकेदारांनी काम घेऊनही मुदतीत पूर्ण केले नाही, तर त्यांना काळ्या यादीत टाका. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. २८ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत कामांना विलंब करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. ठेकेदार कामे वेळेत करत नाहीत. उलट मुदतवाढ मागून वेळ मारुन नेत आहेत. अशा ठेकेदारांना पुढील कामाचा ठेकाही देऊ नये, असे झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरुद्ध आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. दर्जेदार कामे करतील, अशा ठेकेदारांनाच कामे देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर) ठेकेदाराने काम घेतले आणि ते विहीत मुदतीत पूर्ण केले नाही, तर संबंधिताला काळ्या यादीत टाकावे, एक काम पूर्ण होत नसेल, त्या ठेकेदाराला यापुढील काम देऊ नये. पहिले काम पेंडिंग असताना दुसरे काम दिल्यास मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल.