शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्याच जोडण्या, तरीही टंचाई

By admin | Updated: May 12, 2016 23:26 IST

कोरड घशाला : शंभर टक्के पुरवठ्याची पालिकेची क्षमताच नाही...!

प्रकाश वराडकर --रत्नागिरी --रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न हा गेल्या आठ वर्षांच्या काळात सर्वाधिक कळीचा मुद्दा बनला आहे. या प्रश्नी सर्वच राजकारणी पोटतिडकीने बोलतात. परंतु, करत काहीच नाहीत, अशी रत्नागिरीकरांची प्रतिक्रीया आहे. त्यातच शहरातील मालमत्ता २४ हजार २८८ असताना प्रत्यक्षात साडेनऊ हजार नळजोडण्या आहेत. शासकीय मालमत्ता वजा केल्यास नळजोडण्यांचे हे प्रमाण जेमतेम ५० टक्के असून, या निम्म्या कुटुंबांनाही पुरेसे पाणी पुरविण्याची यंत्रणा पालिकेकडे नसावी, याबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरात गेल्या आठ वर्षांपासून होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत आहे. शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, हे पाणी शहरातील पाणी वितरण करणाऱ्या जलवाहिन्या निकामी झाल्याने नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. पाणीपुरवठा होत नाही, कमी दाबाने होतो, पाणीच आले नाही, याबाबत शहराच्या विविध भागातून दररोज महिला, नागरिक तक्रारी घेऊन पालिकेवर हल्लाबोल करतात. त्यांना उत्तरे देताना पाणी विभागाचे सभापती व अधिकारी यांच्या नाकीनऊ येत आहे. स्मार्ट सिटीच्या गप्पा जरूर कराव्यात, परंतु, आधी लोकांना पाणी द्यावे, असा ठणाणा सर्वसामान्य नागरिक करत आहेत. ५० टक्के कुटुंबाना जर पालिका व्यवस्थित पाणीपुरवठा करू शकत नसेल तर उर्वरित ५० टक्के लोकांनी नळजोडण्या मागितल्यास त्यांना पालिका कसा काय पाणीपुरवठा करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहराला सध्या दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर पाणी लागते. सध्या शहरात ९ हजारांवर नळ जोडण्या आहेत. शहराची लोकसंख्या ७७ हजार आहे. साडेनऊ हजार नळजोडण्या म्हणजेच निम्म्या लोकसंख्येला पाणीपुरवठा होतो. सध्याच्या नळजोडण्यांना पुरेसे पाणी शीळ धरणात आहे. परंतु, ते पुरविणारी यंत्रणा निकामी झाली आहे. त्यातच हद्दवाढीची मागणी अधूनमधून केली जाते. शहरातील असलेल्या लोकसंख्येलाच पालिका पाणी पुरवू शकत नाही तर हद्दवाढीनंतर काय अवस्था होईल, याचा विचार तरी कारभाऱ्यांनी केला आहे काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रत्नागिरी शहरातील मालमत्ता २४ हजारांवर असताना तेवढ्याच प्रमाणात पाणी जोडण्या का नाहीत याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अनेक इमारतींमध्ये सदनिका खरेदी केलेल्या आहेत. परंतु, त्या बंद आहेत. त्यामुळे ही स्थिती आहे. याचा अर्थ शहरात १० ते १२ हजार सदनिका बंद आहेत, असे नगराध्यक्षांना म्हणायचे असेल तर ते कोणालाही पटणारे नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील गलथानपणामुळेच अनेक नागरिकांनी घराजवळ विहिरी किंवा बोअरवेल उभारल्या आहेत. मात्र, या विहिरीचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांनी नळजोडण्या मागितल्या तर तेवढी क्षमताच पालिकेकडे नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यातच शहराचा विस्तार सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या रत्नागिरी नगरपालिकेने आधी पाण्याची वितरण व्यवस्था सुधारणे महत्वाचे आहे. रत्नागिरी पालिकेचा भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन पालिकेने दीड वर्षापूर्वीच बावनदीतील १४ एमएलडी पाण्याचे प्रतिदिवसासाठी आरक्षण मागितले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर झाल्याचे सांगण्यात येते. असे असेल तर त्या प्रस्तावाचे काय झाले, याचाही शोध घेऊन पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शहरात सध्या नळजोडण्यांना पाणी मोजणारी यंत्रेच नाहीत. त्यामुळे पाण्याचे मोजमापच होत नाही, अशी स्थिती या यंत्रणेची आहे. यात सुधारणा होणार की नाही, हाच नागरिकांचा सवाल आहे. आरक्षण : बावनदीचे पाणीही अधांतरी..६८ कोटींच्या सुधारीत नळपाणी योजनेचा सध्या गवगवा केला जात आहे. त्यासाठी हालचालीही सुरू आहेत. परंतु, पावसाळा आल्याने ही योजना मंजूर झालीच तर त्याचे काम पावसाळ्याआधी होणे शक्य नाही. त्यामुळे रत्नागिरीकरांचे पाण्याचे हाल यावर्षी तरी काही थांबणारे नाहीत.