शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसातील माणसाला त्याने केला सलाम !

By admin | Updated: November 28, 2014 00:10 IST

त्यांनी जपली माणूसकी : वर्षापूर्वीची आठवण पोलिसाची संवेदना जागविणारी

सुभाष कदम- चिपळूण -सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, त्याला सुखाने जगता यावे, यासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सद्रक्षणाय खलनिग्रहणाय... हे ब्रीद घेऊन अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या पोलिसांकडे समाज तिरस्काराने पाहतो. पण, पोलीसही माणूस आहे. अडचणीच्या काळात त्याच्यातल्या माणुसकीला पाझर फुटतो आणि तोही मदतीला धावतो. एक वर्षापूर्वी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून एका अवलियाने वाहतूक पोलिसांचा लोटे वाहतूक मदत केंद्रात येऊन सत्कार केला आणि सर्वच हेलावले... खाकी वर्दीतला पोलीस पाहिला की, अनेकजण त्याची ‘टर’ उडवतात. पोलीस म्हणजे खाबूगिरी करणारा असा समज समाजात दृढ आहे. पण, पोलीस हा सतत कार्यरत राहून आपल्या सुखदु:खाचा विचार न करता समाजाला सहकार्य करीत असतो. स्वत: जळून समाजाला प्रकाश देण्यात तो धन्यता मानतो. सणवाराचा किंवा घरातील कोणत्याही सुखदु:खाचा विचार न करता तो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून काम करीत असतो. धावपळ, दगदग, अनेकवेळा येणारी आव्हाने तो सहज झेलत असतो. तो एक माणूस आहे. त्यालाही अनेक आव्हानांना सामारे जावे लागते, याचे भान समाज ठेवत नाही. पण, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. समाजात कोणतेही तेढ निर्माण होऊ नये. सर्व गुण्या-गोविंदाने एकत्र नांदावेत, यासाठी पोलीस झटत असतात. दैनंदिन जीवनात अनेक लहान-मोठ्या प्रसंगाना त्यांनाच प्रथम सामोरे जावे लागते. हे वास्तव विसरुन चालणार नाही. एक वर्षापूर्वी म्हणजे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी छत्रपती संभाजी राजे सैनिकी स्कूल, जामगे (खेड) येथील लिपीक अजय आप्पा तोडकरी यांचे वडील आप्पा तोडकरी यांचे मुंबईत निधन झाले. रात्रीची वेळ असल्याने तोडकरी मुंबईला जाण्यासाठी दुचाकीने घराच्या बाहेर पडले. एक्सल फाट्यादरम्यान त्याची दुचाकी पंक्चर झाली. जवळच पोलीस वाहतूक मदत केंद्र आहे. असे त्यांना समजल्याने ते लोटे येथील मदत केंद्रावर आले. रात्रीची वेळ होती. वेळही खूप झाला होता. शिवाय वडिलांच्या अंत्यविधीला तत्परतेने पोहोचायला हवे होते. मदत केंद्रावर रात्रपाळीत कार्यरत असणाऱ्या पोलिसांना त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्या पोलिसांनीही तोडकरी यांना गाडी मिळवून दिली. त्यामुळे ते अंत्ययात्रेला पोहोचू शकले. त्यांनी खेड पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली आणि लोटे पोलीस वाहतूक मदत केंद्र येथे येऊन तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांना सलाम केला.अशी परतफेड होईल, असे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय तोडकरी यांना धन्यवाद दिले.