वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा जिम्नॅस्टिकतर्फे वेंगुर्ले येथे राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत राज्यातील २५0 महिला खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ले-कॅम्प येथे जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी २७ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवा नेते संंदेश पारकर, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, स्पोर्ट क्लबचे राजन गिरप, रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. शैलेश नाबर, राज्य जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजता दाभोली नाका येथून वेंगुर्ले बाजारपेठमार्गे हॉस्पिटलनाका ते कॅम्प क्रीडा संकुलापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे उद्घाटन पोलिस निरीक्षक रतनसिंह रजपूत यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वागत, संयोजन, रॅली, निधी, खेळाडू निवास, भोजन, स्पर्धा, प्रसिद्धी, वाहतूक, समारोप या समित्या गठीत केल्या आहेत. या समित्यांमध्ये नगराध्यक्ष, रोटरी क्लबचे पदाधिकारी, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडा संघटनांच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)वेंगुर्लेत २७ पासून जिम्नॅस्टीक स्पर्धा नंदन वेंगुर्लेकर : राज्यस्तरीय स्पर्धेत २५0 महिला खेळाडू सहभागी होणारवेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा जिम्नॅस्टिकतर्फे वेंगुर्ले येथे राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत राज्यातील २५0 महिला खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ले-कॅम्प येथे जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी २७ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवा नेते संंदेश पारकर, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, स्पोर्ट क्लबचे राजन गिरप, रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. शैलेश नाबर, राज्य जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजता दाभोली नाका येथून वेंगुर्ले बाजारपेठमार्गे हॉस्पिटलनाका ते कॅम्प क्रीडा संकुलापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे उद्घाटन पोलिस निरीक्षक रतनसिंह रजपूत यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वागत, संयोजन, रॅली, निधी, खेळाडू निवास, भोजन, स्पर्धा, प्रसिद्धी, वाहतूक, समारोप या समित्या गठीत केल्या आहेत. या समित्यांमध्ये नगराध्यक्ष, रोटरी क्लबचे पदाधिकारी, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडा संघटनांच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
वेंगुर्लेत २७ पासून जिम्नॅस्टीक स्पर्धा
By admin | Updated: November 24, 2015 00:29 IST