शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

प्रभाग तेरामधून गुरववाडी नाव गायब

By admin | Updated: December 5, 2014 23:35 IST

लांजा नगरपंचायत : प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा

लांजा : नव्याने निर्माण झालेल्या लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग रचना क्रमांक १३मध्ये गुरववाडी आहे. मात्र, गुरववाडीचे नाव या प्रभागातून गायब झाल्याने येथील ग्रगामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. लांजा गावच्या स्थापनेपासून आजपर्यंत लांजा गावाच्या नकाशामध्ये ७/१२मध्ये म्हणजे शासनाच्या महसूल खात्यामध्ये ‘गुरववाडी’ अशी नोंद होती व आहे. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या लांजा नगरपंचायतीचा प्रभाग रचना क्र. १३मध्ये गुरववाडीचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे तशी हरकत घेऊन गुरववाडी असे नाव नमूद करण्यास सूचित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाच्या सर्व कागदपत्रांवर तसेच बांधलेल्या घराच्या घरपट्टी दुसऱ्या वाडीच्या नावाने दिली. या वाडीमध्ये नुसत्या गुरव समाजाची ५० ते ५५ घरे आहेत. याशिवाय इतर समाजाचीसुध्दा घरे आहेत. त्यांच्याही घराच्या ७/१२ला गुरववाडी आहे. नळपाणी योजना, रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक खाती निवडणूक ओळखपत्र, मुलांचे शाळेचे दाखले इत्यादी सर्व कागदपत्रांवर गुरववाडी अशी नोंद आहे. मात्र, घरपट्टीवर दुसऱ्याच वाडीच्या नावाने असल्याने वास्तव्याचा दाखला, पासपोर्ट, जातीचा दाखला काढताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांमध्ये सध्या गोंधळ निर्माण होत आहे. आता नगरपंचायतीच्या प्रभाग सूचनेमध्ये गुरववाडी गायब झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, सर्व कागदपत्रांवर गुरववाडी अशी नोंद आहे. तीच नोंद नगरपंचायतीच्या कागदपत्रांमध्येही मिळावी व ग्रामस्थांचा संभ्रम दूर करावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतीचा मुद्दा लेखी स्वरुपात देण्यात आला आहे. तरीही गुरववाडी अशी नोंद नगरपंचायत प्रशासनाने केली नाही, नजीकच्या काळात तर आंदोलनाबरोबरच येत्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मारुती गुरव व गजानन गुरव यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिली आहे. (प्रतिनिधी)