शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

गुंड काळसेकरला जन्मठेप

By admin | Updated: July 14, 2016 00:30 IST

पोलिसांवरील हल्ला प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

रत्नागिरी : पोलिसाच्या डोक्यात चिरा घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार साहील अजमद काळसेकर (२६, नायशी मुस्लिम मोहल्ला, चिपळूण) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायाधिशांवर चप्पल फेकून मारणे, वाहनचोऱ्या अशा अनेक प्रकरणांमध्ये काळसेकर याच्यावर गुन्हे दाखल आहेत. साहील काळसेकर हा पोलिसांच्या लिस्टवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चिपळूणसह रत्नागिरी पोलिस स्थानकात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला केला. त्या प्रकरणात आता त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २०१५ मध्ये अनेक गुन्ह्यांसाठी ‘वाँटेड’ असलेला काळसेकर पोलिसांचा हाती लागत नव्हता. त्यामुळे चिपळूण न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होेते. त्याचदरम्यान तो रत्नागिरीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस नाईक उदय वाजे व पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण बर्गे यांना मिळाली. या माहितीनुसार १२ जुलै २०१५ रोजी प्रवीण बर्गे व उदय वाजे हे मिरजोळे येथील एमआयडीसी रोडवर फिनोलेक्स कॉलेज येथे काळसेकर याला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी काळसेकर याने हरकत घेऊन उदय वाजे यांच्या अंगावर चावे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाजे खाली पडले. त्याचवेळी साहीलने त्यांच्या डोक्यात चिरा घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाजे तत्पर असल्यामुळे ते बाजूला सरकले. तो चिरा त्यांच्या पायांवर पडून ते जखमी झाले होते. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे तपास अंमलदार पूनम पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गेल्या वर्षभरापासून हा खटला न्यायालयामध्ये सुरू होता. सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्याचे पुरावे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी काळसेकर याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विनय गांधी यांनी काम पाहिले. (वार्ताहर) अनेक गुन्ह्यांत होता समावेश सराईत गुन्हेगार असलेल्या साहिल काळसेकर याला भा.दं.वि.क. ३०७ अन्वये जन्मठेप, भा.दं.वि.क. ३३२ अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी, २५ हजार दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, भा.दं.वि.क. ३५३ अन्वये दोन वर्ष सक्तमजुरी २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी व भा.दं.वि.क. ५०६(२) पाच वर्षे सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपीने एकाचवेळी भोगावयाच्या आहेत.