शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

हा तर सागरी महा‘खड्डे’मार्ग!

By admin | Updated: November 16, 2016 22:36 IST

सागरी मार्गाची दुर्दशा : गणपतीपुळेकडे जाताना होतोय जिवाशी खेळ

रत्नागिरी : आरे - वारेमार्गे गणपतीपुळेला जाणाऱ्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिने ‘शॉर्टकट’ असलेला हा मार्ग पर्यटकांना सध्या ‘लाँग कट’ भासू लागला आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत की काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यानंतर या मार्गावर काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, आता त्याच्या दुप्पट खड्डे पडल्याने वाहनचालक अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहात आहेत. पर्यटकांना समुद्राचे दर्शन घेत प्रवास करता यावा, यासाठी निर्माण केलेल्या सागरी महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गणपतीपुळे धार्मिक क्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही आज जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पावलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरवर्षी लाखापेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी येतात. या मार्गावरील आरे-वारे बीच तसेच इतर स्थळेही पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. तसेच ठराविक अंतरावर नावांचे दिशादर्शक फलक नसल्याने रात्री - अपरात्री या रस्त्यावरून वर्दळ सुरू असतानाही गणपतीपुळे कुठे आहे, अशी विचारणा पर्यटकांना जागोजागी करावी लागते. रस्त्यालगत झाडीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या गोष्टींमुळे पर्यटकांना या मार्गावरून ये-जा करणे त्रासदायक होत आहे. जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मार्गाच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनाचेही दुर्लक्ष झालेले आहे. पर्यटकांनी जिल्ह्यात यावे, यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. दरवर्षीच पर्यटन महोत्सवावर प्रशासन रत्नागिरी ते आरेवारे हे २२ किमी अंतर आहे. यादरम्यान शिरगाव दत्तमंदिर, शिरगाव मोहल्ला, कासारवेली मयेकर घर ते लक्ष्मीकेशव थांबा, काळबादेवी रेशन दुकान, बसणी पोखरबाव ते आरे वारे कॉर्नर, आरे सुरुबन, आरे वारे पूल ते गजानन मयेकर यांचे घर, नेवरे काजिरभाटी ते भंडारपुळे यादरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. करोडो रूपये खर्च करते. मात्र, गणपतीपुळेसारख्या क्षेत्राच्या विकासाबाबत उदासीनता दाखवून दुर्लक्ष करीत असल्याबद्दल पर्यटकांकडूनच नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथूनच खड्डेमय रस्ता सुरु होतो. शिरगावमधील रेशन दुकान याठिकाणी तर एवढे खड्डे पडले आहेत की, तेथून चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचाही तोल ढळू शकतो. शिरगाव दत्तमंदिर, बसणी या भागातही रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याबाबत लोकप्रतिनिधींना कोणतेही सोयरसुतक नाही. शिरगाव रेशन दुकानापासून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या रस्त्याची सात-आठ महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. खडी आणि डांबर टाकून खड्डे बुजावण्यात आले. मात्र, त्याठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त खड्डे आता पडले आहेत. लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याच्या नावे लोक शिव्यांच्या लाखोली वाहात आहेत. रस्ता अरुंद असल्याने शिरगाव येथे वारंवार वाहतूककोंडी होते. त्यातच रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक संथगतीने सुरू असते. रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. शहरात आलेला पर्यटक गणपतीपुळेकडे जाताना नाक मुरडतो, त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे.