शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST

वन्य प्राण्यांपासून नुकसान : रात्रंदिवस शेतकऱ्यांचा पहारा

सुभाष कदम --- चिपळूण तालुक्यात रानडुक्कर व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे आजही ग्रामीण भागात वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गवताची माची करुन रात्रंदिवस शेतकरी पहारा करीत असतात. खरीपाच्या हंगामात कोकणात राबराब राबून भातपीक घेतले जाते. लहरी हवामान, वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे वारंवार पिकाचे नुकसान होत असते. पावसाळ्यात खेकडे रोपांची नासधूस करतात. तर त्यानंतर तयार झालेली शेती रानडुक्कर, वानर किंवा तत्सम प्राणी मातीमोल करतात. घरापासून दूरवर असलेल्या शेतात पीक तयार झाले की त्याचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडावरच खोप काढून त्यात रात्रंरात्र जागून काढावी लागते. यावेळी लांब रस्सीला डबे बांधून किंवा फटाके वाजवून वन्यप्राण्याला पळवून लावले जाते. काही ठिकाणी साड्या बांधण्यात येतात किंवा बुजगावणे उभे केले जातात. आजही ग्रामीण भागात शेती संरक्षणासाठी सहजतेने शस्त्र परवाना मिळत नाही. अनेकांना गरज असतानाही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने विनंती करुनही शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही अशा दिव्यातून जावे लागत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. मग, यावर विविध उपाययोजना करून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसतात. शेतीच्या संरक्षणासाठी सरकार मदत करत नाहीच पण नुकसान भरपाईही देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्याला बारमाही शेतात राबावे लागते. शेती संरक्षणासाठी माचीत बसताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाने याचा विचार करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पीक वाया जातेवन्य प्राण्यांचा धोका पिकाला असतो. अनेकवेळा हाताशी आलेले पीक वाया जाते. शासनाकडून शेतीसाठी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाच दिवसरात्र शेताची राखण करावी लागते. त्यासाठी विविध उपाययोजना शेतकरी करीत असतो, असे कुटरे कवडेवाडी येथील मनोहर कवडे व अरविंद कवडे यांनी सांगितले. दुष्टचक्राचा फेराहवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पावसामुळे वाया जाणारे पीक तर कधी अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे.नुकसान भरपाईची मागणीनिसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही शेती करणे बंद केलेले नाही. संकटांचा सामना करत शेतकरी भातशेतीचे उत्पादन घेत आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.