रत्नागिरी : ग्रामपंचायतीमध्ये ३६ लाख ६९ हजार ४३१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माखजन ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक जितेंद्र मुकुंद मांगले आणि तत्कालीन सरपंच सतीश कुंभार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ तसेच ग्रामसेवक मांगले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळमपाटील यांनी आज, शनिवारी दिली़मांगले सध्या लांजा तालुक्यात कार्यरत आहे. मांगले याने २०११-१२ ते २०१२-१३ या कालावधीत ग्रामपंचायत ग्रामनिधीतून विविध योजनांमध्ये झालेल्या खर्चामध्ये ३२ लाख ८५ हजार ११४ रुपयांचा आणि बाराव्या व तेराव्या वित्त आयोगातून झालेल्या खर्चामध्ये एकूण ३ लाख ८४ हजार ३१७ रुपये असा एकूण ३६ लाख ६९ हजार ४३१ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. तब्बल १९ प्रकारच्या कामांमध्ये अपहार केल्याचे तपासणीत निदर्शनास आले़ तसेच काही कामांची मोजमापे दुबार करण्यात आली़ यामध्ये तत्कालीन सरपंच सतीश कुंभार यांना हाताशी धरून ग्रामसेवक मांगले याने हा अपहार केला़ सूचना देऊनही ग्रामपंचायतीचे दप्तर मांगले याने अनधिकृतपणे स्वत:च्या ताब्यात ठेवल्याची गंभीर बाबही उघड झाल्याचे काळमपाटील यांनी सांगितले़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा दणकाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळमपाटील यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत २२ कर्मचारी, अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.आज त्यांच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच ग्रामसेवक मांगले याला निलंबित करून त्यांनी आणखी एक धक्का दिला़
अपहार प्रकरणी ग्रामसेवक निलंबित
By admin | Updated: January 18, 2015 00:37 IST