दापोली : रविवारी ग्रामपंचायतीचे कार्यालय बेकायदा उघडून एका ग्रामसेवकाने शासकीय दस्तऐवजामध्ये १९६८ साली झालेल्या विवाहाची नोंद केली असून, दापोलीजवळील खेर्डी ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. खेर्डी ग्रामपंचायतीचे कार्यालय नेहमीप्रमाणे रविवार, दि. २० जुलै रोजी बंद होते. ज्योती अवधूत मेहेंदळे येथे ग्रामसेविका आहेत. रविवारची सुटी असल्याने कार्यालय बंद होते. खेड तालुक्यात कार्यरत असणारा एक ग्रामसेवक काही लोकांसमवेत एका अलिशान गाडीतून खेर्डी गावात दाखल झाला. कोतवालाला हाताशी धरुन २० जुलै २०१४ रोजी ग्रामपंचायतीच्या विवाह नोंदणी रजिस्टरमध्ये ०२ मे १९६८ची विवाह नोंद ०९ डिसेंबर २००५ अशी घातली. व्हाईटनरचा वापर करून विवाह नोंदणी रजिस्टरमध्ये खाडाखोड केली असल्याची तक्रार देण्यात आली आहे. ११ एप्रिल २०१४ रोजी सदस्यांनी भेट देऊन सदरचा गंभीर प्रकार विद्यमान ग्रामसेविका ज्योती मेहेंदळे यांच्या निदर्शनास आणून दिला. शंकर कृष्णा जाधव (रा. पोयनार) यांचा विवाह शांताबाई गोपाळ पवार (रा. खेर्डी) यांच्याशी झाला असल्याची ही नोंद आहे.(प्रतिनिधी)
ग्रामसेवकानेच केली
By admin | Updated: August 19, 2014 23:49 IST