शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे

By admin | Updated: March 10, 2016 23:53 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा : सुधारित नळपाणी योजना ६७ कोटींची : मयेकर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ६६ कोटी ८७ लाख ९५ हजार ३७३ रुपयांचा प्रस्ताव ८ मार्चला शासनाला सादर करण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्पाचा १४ कोटी ७० लाख ३४ हजार ४७० रुपयांचा प्रस्तावही त्याचवेळी राज्य शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी गुरुवारी झालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या मासिक सभेच्या सुरुवातीला दिली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था नाजूक बनली आहे. अंतर्गत जलवाहिन्या जुनाट झाल्याने अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. या जलवितरण व्यवस्थेची उपग्रहीय पाहणी करून त्याचा अहवालही बनविण्यात आला आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या विविध भागांतील पाणी वितरणात असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळेच पाणी वितरण व्यवस्था सक्षम बनविण्यासाठी वाढीव पाणीपुरवठ्याच्या सुधारित योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादरपाणी वितरण व्यवस्था जुनाटरत्नागिरी शहराला पानवल धरण व शीळ धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. पानवल हे नगरपरिषदेच्या मालकीचे धरण आहे. शीळ धरणातील शंभर टक्के पाणी रत्नागिरी नगरपरिषद पाटबंधारेकडून विकत घेत आहे. दररोज शहराला १५ ते १६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यातील १२ दशलक्ष घनमीटर पाणी हे शीळ धरणातून दररोज जॅकवेलद्वारे घेतले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता पाणीसाठा पुरेसा असला, तरी जुनाट झालेल्या वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यासाठीच वाढीव पाणी योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात साडेनऊ हजार नळ जोडण्या असून, वार्षिक पाणी आकारणी अडीच कोटींच्या घरात आहे. वाढत्या बांधकामांमुळे नळ जोडण्यांची मागणी वाढत असून, वितरण व्यवस्था कोलमडल्याने पाणीपुरवठ्यात अनेकदा व्यत्यय निर्माण होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठीही साडेआठ कोटींची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून रेंगाळल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार १४ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)