टेंभ्ये : सोमवार ४ मे रोजी येणाऱ्या बौध्द पौर्णिमेची माध्यमिक शाळांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीच्या मोबदल्यात दिवस भरुन काढण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे यांनी दिले आहेत. शाळांना देण्यात आलेल्या वार्षिक नियोजनांना देण्यात आलेल्या वार्षिक नियोजनामध्ये या सुट्टीचा समावेश नसल्यामुळे शाळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी वर्षातील सुट्ट्यांचे पूर्ण नियोजन केले जाते. शाळा संहितेमधील तरतुदीनुसार रविवार वगळता ७६ दिवसांपेक्षा अधिक दिवस सुट्टी देता येत नाही. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुट्ट्या निश्चित करताना नजरचुकीने बौध्द पौर्णिमेची सुट्टी मध्ये आली होती. चालू शैक्षणिक वर्ष शुक्रवार ८ मे पर्यंत चालणार आहे. यामुळे बौध्द पौर्णिमेची सुट्टी शाळांना देणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाधिकारी स्तरावरुन बौध्द पौर्णिमेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही सुट्टी घेत असताना शाळांचे सुट्ट्यांचे दिवस ७६ पेक्षा अधिक होणार याची काळजी घेणे अवश्यक आहे.बौध्द पौर्णिमेची सुट्टी घेतल्यानंतर हा दिवस भरुन काढण्यासाठी शिक्षणाधिकारी अहिरे यांनी शाळांसमोर काही पर्याय ठेवले आहेत. यामध्ये जर शाळांकडे मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील स्थानिक सुट्टी शिल्लक असेल तर बौध्द पौर्णिमेची दिवशी ती सुट्टी घेण्यात यावी. जर स्थानिक सुट्टीचा पर्याय उपलब्ध नसेल तर अन्य सुट्टीच्या दिवशी शाळा भरवून बौध्द पौर्णिमेच्या सुुट्टीचा दिवस भरुन काढण्यात यावा. या दोन पैकी उपलब्ध पर्यायाचा वापर शाळांना करावा लागणार आहे. ज्या शाळांकडे स्थानिक सुट्टी शिल्लक नसेल अशा शाळांना रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. या शैक्षणिक वर्षात प्रथमच जिल्ह्यात रविवारी शाळा घ्याव्या लागल्या आहेत. यापूर्वी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची सुट्टी भरुन काढण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये रविवारी शाळा भरविण्यात आली. तसेच काही शाळांनी महावीर जयंतीच्या सुट्टीचा दिवस भरुन काढण्यासाठी रविवारी शाळा भरविली. आता ज्या शाळांकडे स्थानिक सुट्टी शिल्लक नसेल अशा बौध्द पौर्णिमेची सुट्टी भरुन काढण्यासाठी पुन्हा रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. सोमवार दि.४ मे रोजी येणाऱ्या पौर्णिमेची सुट्टी माध्यमिक शाळांना दिल्याने आता रविवारी शाळा भरवावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून त्याकडे आता शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी बौध्द पौर्णिमेची शासकीय सुट्टी घ्यावी. या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. - राजेंद्र अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी बौध्द पौर्णिमेची शासकीय सुट्टी घ्यावी. या सुट्टीच्या बदल्यात दिवस भरुन काढावा. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. - राजेंद्र अहिरे माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी
बुध्दपौर्णिमेची ‘माध्यमिक’ला शासकीय सुट्टी
By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST