शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती भूमिहीनांना कसण्यासाठी शासन देणार जमीन

By admin | Updated: September 1, 2014 23:10 IST

नवीन योजना : शेतमजुरांना मिळणार उत्पन्नाचा स्रोत

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतमजूर कुटुंबाना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्याकरिता चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांचे सबलीकरण व स्वाभिमान वाढवण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज या स्वरुपात निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २००४ पासून ही योजना लागू झाली आहे. शासनाकडून उपलब्ध झाल्यास शासकीय जमीन अथवा शासनाकडून जमीन खरेदी करुन शासन निर्णयातील अटी शर्ती विचारात घेऊन ती भूमीहीन शेतमजूर विधवा, परित्यक्ता यांच्या नावे केली केली. जमीन अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या पती-पत्नीच्या नावे केली जाईल. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के रक्कम अनुदान असेल. कर्जाचा भाग वित्तीय संस्था अथवा राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली किंवा राष्ट्रीयीकृत आणि सहकार बँक यांना देय व्याज शासनाकडून देण्यात येईल. लाभार्थींचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ६० वर्षे असावे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर असावा. महसूल व वन विभागाने ज्यांना गावरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जमीन उपलब्ध करुन दिलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द, भूमीहीन शेतमजूर कुटुंबास कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तिला हस्तांतरीत करता येणार नाही. अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतमजूर कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी व दहा वर्षे मुदतीकरिता असेल. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षांनंतर सुरु होईल. लाभार्थीने मुदतीत कर्ज फेडणे आवश्यक आहे. अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थीने सहायक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)