रत्नागिरी : ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त येथील ‘लोकमत’ आवृत्ती यांच्यातर्फे जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये आज (दि. २ रोजी) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी विविध प्रकारच्या रूग्णांसाठी रक्ताची मागणी वाढत आहे. मात्र, त्यामानाने रक्तदाते कमी आहेत. हे लक्षात घेऊन जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यावर्षीही येथील जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये हा रक्तदान उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ‘लोकमत’च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच प्रतिक मुळ्ये, चिनार गांधी, सिद्धांत शिंदे, अभिषेक खंडागळे, मंदार खंडागळे, गणेश देसाई, स्वप्नील शिंदे, अजित भुये, आदींनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी जाणीव फाऊंडेशन तसेच स्वराज्य मित्रमंडळ या संस्थांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय रक्तपेढीतील जनसंपर्क अधिकारी कुणाल साळवी, तंत्रज्ज्ञ संगीता धोपटे, कक्षसेवक राजू पवार, परिचारक शाहीन मॅथ्यू, परिचारिका जयश्री मॅथ्यू यांचे सहकार्य लाभले. जिल्हा रूग्णालयाच्या सहकार्याबद्दल ‘लोकमत’तर्फे डॉ. पराग पाथरे यांचे आभार मानण्यात आले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
By admin | Updated: July 2, 2016 23:37 IST