शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी गोलमडे

By admin | Updated: February 24, 2016 00:01 IST

बिनविरोध निवड

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम तथा बुवा गोलमडे यांची आज (मंगळवार) दुपारी ३ वाजता बिनविरोध निवड झाली. या पदासाठी शिवसेनेकडून आधीच त्यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अन्य कोणीही उमेदवार नसल्याने गोलमडे बिनविरोध विजयी झाले. त्यांच्या निवडीने चिपळूणला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान प्रथमच मिळाला आहे. सेना नेत्यांच्या आदेशानुसार जगदीश राजापकर यांनी २७ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलल्या सतीश शेवडे यांच्याकडे १ फेबु्रवारीपासून अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. या पदासाठी चिपळूणला मान मिळावा, अशी मागणी होती. त्यामुळे गोलमडे यांचे नाव आघाडीवर होते. त्यांना मातोश्रीवरूनही हिरवा कंदील मिळाल्यानंतर आज गोलमडे बिनविरोध विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज सकाळी ११ ते दुपारी १ वाजता या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यामध्ये फक्त गोलमडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांनी स्वतंत्र उमेदवार उभा न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दुपारी ३ वाजता गोलमडे बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात गोलमडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी बाळासाहेब व उध्दव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सेनेच्या सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. या निवडीच्यावेळी चिपळुणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम तसेच सेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (प्रतिनिधी)