शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

क्रीडा चळवळीचा सोनेरी आलेख

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

क्रीडा क्षेत्रातील चमकते तारे...

रत्नागिरीत आता क्रीडा चळवळ हळूहळू वाढू लागली आहे. विविध खेळांच्या संघटना आता आपल्या खेळाचा प्रसार करताना त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यामुळे ते कष्ट सार्थकी लावताना त्यांचे स्पर्धक विविध पातळ्यांवर यश मिळवीत आहेत. गतवर्षीचा आढावा घेताना जिल्ह्यात शालेयस्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर दरवर्षीप्रमाणे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फेही अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात विविध खेळांचा समावेश असल्याने सर्व संघटनांचा समावेश होता. या सर्वांच्या सहभागातून वर्षभरात झालेल्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद दर्शविला. एकंदरीत रत्नागिरीतील क्रीडा चळवळ सर्व क्रीडा संघटनांच्या प्रयत्नाने वाढू लागली आहे, ही नोंद घ्यावीच लागेल.गतवर्षाकडे डोकावून पाहताना विशेष नोंद घ्यायला लावणाऱ्या काही क्रीडारत्नांचा उल्लेख आवर्जुन करावाच लागेल. अगदी फेब्रुवारी २०१४ मध्ये रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या पटांगणावर राज्यस्तरीय योगा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात रत्नागिरीची लहानगी योगापटू पूर्वा किनरे हिने उल्लेखनीय यश मिळविले. त्यापूर्वी तिने अनेक स्पर्धा काबीज केल्या होत्या. तिने नुकत्याच फ्रान्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले. रत्नागिरीची दुसरी कन्या म्हणजे अ‍ॅथलेटिकपटू रिझवाना ककेरी. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही परिश्रमपूर्वक वयाच्या २२व्या वर्षी रत्नागिरीचे नाव तिने राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या धावपटू असलेल्या रिझवाना ककेरी हिने वांद्रे (मुंबई) येथे पार पडलेल्या मस्तरन २०१४च्या २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय पुणे मॅरेथॉनमध्येही तिने भारतीय महिला गटातून दुसरा क्रमांक मिळवला. रत्नागिरीचा सुपुत्र म्हणजे रियाज अकबर अली याने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या २१व्या आॅल इंडिया कॅरम फेडरेशनमध्ये ३ ब्रेक टू फिनीशची नोंद केली. संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचा सुपुत्र सागर शांताराम पवार यानेही भारतीय इनडोअर हॉकी संघातून मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बहारदार खेळाचे प्रदर्शन करीत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. हॉकीसारखा खेळ रत्नागिरीत रूजत असल्याची पोचपावतीच म्हणायला हवी. या वर्षात रत्नागिरी नगरपरिषदेनेही पालिकांतर्गत शाळांचा सहभाग असलेल्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून शाळांना संधी उपलब्ध करून दिली. नगरपरिषदेने महिलांसाठीही यावेळी विविध स्पर्धांबरोबरच विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. इतर तालुक्यांनीही महिलांच्या क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिले होते. हे चित्र नक्कीच आशावादी म्हणायला हवे. याबरोबरच इतर खेळातही आता जिल्ह्यात चांगले खेळाडू तयार व्हायला लागलेत, हे महत्त्वाचे.क्रीडा क्षेत्रातील चमकते तारे...1फ्रान्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेतही रत्नागिरीच्या पूर्वा किनरे हिने सुवर्णपदक पटकावून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले. तिने दोन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या चिमुकलीने केलेल्या पराक्रमाने भारावलेल्या रत्नागिरीकरांनी तिची शहरातून जंगी मिरवणूक काढत शाबासकीची थाप दिली.2रत्नागिरीची हुकूमी धावपटू असलेल्या रिझवाना ककेरी हिनेही हे वर्ष गाजवले. राष्ट्रीय स्तरावर तिने रत्नागिरीचे नाव नेले. वांद्रे येथील मॅरेथॉन स्पर्धेेतही तिने दुसरा क्रमांक पटकावला.3रत्नागिरीचा सुपुत्र म्हणजे रियाज अकबर अली याने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या २१ व्या आॅल इंडिया कॅरम फेडरेशनमध्ये ३ ब्रेक टू फिनीशची नोंद केली. रियाज हा रत्नागिरीचा हुकूमी कॅरमपटू मानला जातो.4संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचा सुपुत्र सागर शांताराम पवार याने भारतीय इनडोअर हॉकी संघातून मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बहारदार खेळाचे प्रदर्शन करीत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.