शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोकण कृषी विद्यापीठाचा सुवर्णकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत, शिरगाव - रत्नागिरी येथील संशाेधन केंद्रांनी शाेधून काढलेल्या नवनवीन जाती, संकरित जाती व निरनिराळ्या लागवडीसाठी ...

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत, शिरगाव - रत्नागिरी येथील संशाेधन केंद्रांनी शाेधून काढलेल्या नवनवीन जाती, संकरित जाती व निरनिराळ्या लागवडीसाठी विकसित केलेले तंत्रज्ञान यामुळे आता कोकणची उत्पादकता जवळपास ३५ क्विंटलच्या आसपास गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सन १९८८ - ८९मध्ये रोजगार हमी योजनेमध्ये फळपिकांचा समावेश करणाऱ्या क्रांतिकारक निर्णयामुळे कोकणच्या शेतीची दिशाच बदलून गेली. ३५ हजार हेक्टरवर असलेले काजू व आंबा क्षेत्र जवळपास आज ३.५ लाख हेक्टरवर गेले आहे. खरंतर हे क्षेत्र वाढविण्यामागे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आंब्याचे कोय कलम व काजूचे मृदकाष्ट कलम यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

कोकणामध्ये केली जाणारी शेती ही फावल्या वेळेची शेती या सदरातच मोडते. म्हणजे दुकान व नोकरी सांभाळून केलेली शेती. शेतीला दुय्यम दर्जा दिल्याने शेती फायद्यात कशी येईल? शेती म्हणजे फक्त भात लागवडच नव्हे तर त्याच्यामध्ये भाजीपाला लागवड, आंबा लागवड, काजू लागवड हे जसे महत्त्वाचे आहे तसे शेतीतील पूरक व्यवसाय जसे की, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मधुमक्षिका पालन असे इतर व्यवसायही आपण केले पाहिजेत. पूर्वीच्या काळी हे असेच व्यवसाय केले जात असत आणि त्यामुळे शेती टिकून होती. थोडक्यात काय या सगळ्याचा आपण जर योग्य पध्दतीने वापर केला तर खतांवरील खर्च आपोआप कमी होतो आणि उत्पादन जास्त मिळते. आपण गोंडस शब्दामध्ये याला ‘सेंद्रिय शेती’ म्हणू शकतो.

भारताला स्वातंत्र्य मिळताना भारत हा गरीब या सदरात मोडत होता. लोकांना दोनवेळचे अन्न मिळत नव्हते. स्वर्गीय पंतप्रधान शास्त्रींनी लोकांना एक दिवस उपवास करा, असे आवाहनही केले होते आणि या सगळ्याचा विचार करुन डॉ. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली १९६८ साली जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी भारतात हरितक्रांती आणण्यात आली. क्वचितच आज भारताची गोदामे धान्याने भरुन गेली आहेत. तथापि या हरितक्रांतीमुळे भारताची पारंपरिक शेती व्यवसाय पध्दती ही सेंद्रिय शेतीशी निगडीत होती, ती बदलून रासायनिक शेतीकडे वळली.

कालांतराने धवलक्रांती, इंद्रधनू क्रांती, पित क्रांती अशी विविध क्रांती भारतात झाली आणि भारताची परंपरागत शेती बदलत चालली. कोकणातील शेतीमध्ये निरनिराळे विचार येऊ लागले.

सध्याचा काळ हा कोकणासाठी क्रांतीकारक आहे, असे मी समजतो. समाजाचा शेतीबाबतचा दृष्टीकाेन कोरोनामुळे बदलून गेला. कोरोनामध्येही शेती व्यवसाय तग धरुन उभा आहे. मुंबई, पुणे येथे असलेला चाकरमानी आज परत गावाकडे वळू लागलेला आहे आणि शेती हा व्यवसाय म्हणून कसा करता येईल, हा दृष्टीकाेन घेऊन तो पुढे चालला आहे. या इंटरनेट युगातला तरुण यू टयूब, व्हॉट्सअ‍ॅप यावर माहिती समजून विद्यापीठाला भेट देऊन यामध्ये उतरु लागला आहे. रामदास स्वामी यांनी सांगितल्यानुसार, ‘अभ्यासोनी प्रकटावे’नुसार स्वत: आधी त्याचा अभ्यास करतो आणि नंतर त्या व्यवसायामध्ये उतरतो आणि मग त्या समाजाला काय हवे म्हणजे भात शेतीसाठी किंवा लाल किंवा काळ्या भाताची शेती करत असेल. कुक्कुटपालनामध्ये देशी कोंबड्यांचा उद्योग करत असेल. याशिवाय असे बरेच अपारंपरिक शेती व्यवसाय आहेत जसे की, लाव्ही पालन, अळंबी लागवड, बंदिस्त शेळीपालन, मस्त्यपालन इत्यादी शेतीपूरक व्यवसाय करायला जातो. शेती फायदेशीर ठरायची असेल तर उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यात थेट संपर्क झाला पाहिजे. तसेच उपभोक्त्याला जे पाहिजे ते त्या स्वरुपात दिले पाहिजे तर फायदा होतो. नवीन पिढी हे जाणते आणि म्हणूनच योग्य पध्दतीने तयार होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करुन तो माल योग्य पध्दतीने पणन करण्याची क्षमता आजच्या पिढीकडे आहे आणि म्हणूनच ज्या-ज्याठिकाणी ही तरुण मंडळी शेतीकडे वळली तिथे-तिथे त्यांनी शेतीपूरक व्यवसायाबरोबर सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटनाची संकल्पना मांडली आहे. निसर्गाने कोकणाला दिलेले मुक्तहस्ते निसर्गसौंदर्य आणि ७२० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनारा आणि सहा महानगरपालिका यांची बाजारपेठ या सगळ्यांचा विचार करुन आणि तरुण पिढीने एकत्र येऊन शेती व्यवसाय करावा आणि समृध्दी प्राप्त करावी.

————————————

शेती परंपरागत व्यवसाय

खरंतर शेती हा आपला परंपरागत व्यवसाय आहे. पराशर ऋषीने शेती कशी करावी आणि शेतीच्या संशाेधनाबद्दल सांगून ठेवलेले आहे. खरंतर पराशर ऋषी जगातील शेतीमध्ये काम करणारे पहिले शास्त्रज्ञ. सुदैवाने ते महाराष्ट्रातील पारनेर येथील होते. पण कालांतराने ज्या पध्दतीने इतर शास्त्रांच्या बाबतीत चुकीचा इतिहास मांडला जाऊ लागला. तसाच तो कृषी शास्त्राच्या बाबतीतही मांडला जाऊ लागला.

——————————-

शेतीकडे व्यावसायिकदृष्टया पहावे

पूर्वी आंबा लागवडीसाठी कलमे रत्नागिरीहून एस. टी.च्या टपावरुन नेली जात असत. साहजिकच त्याला मर्यादा येत असे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये छोट्या - छोट्या प्लास्टिक पिशवीमध्ये कलमे वाहून नेणे व तयार करणे हे सहज साध्य झाले आहे. सर्वसाधारणपणे लोकांच्या मनामध्ये शेती हा तोट्यातील किंवा आतभट्टीचा व्यवहार असा समज आहे. परंतु, वस्तूस्थिती तशी नाही. पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. आजही तशी परिस्थिती येऊ शकते जर आपण शेती व्यवसायिकदृष्टया केली तर.

- डॉ. संजय भावे, संचालक, विस्तार शिक्षण, काेकण कृषी विद्यापीठ, दापाेली.