शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोकण रेल्वेतून कॅन्सरग्रस्त बालकांची गोवा सहल

By admin | Updated: November 6, 2014 21:59 IST

कर्करूग्णांना दिलासा : वेदनाना दिली नवी उभारी; नवा उत्साह संचारला

रत्नागिरी : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्ती आयुष्यातील आनंदच घालवून बसतात. त्यांच्या जोडीला असतात त्या जीवघेण्या वेदना. पण, कॅन्सरग्रस्त बालकांनाही त्यांचे उज्ज्वल भविष्य खुणावत असते. अशा बालकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, आनंद उपभोगता यावा, या उद्देशाने कोकण रेल्वेने या बालकांसाठी चार दिवसांची मुंबई - गोवा सहल आयोजित केली आहे.कोकण रेल्वे २००७ सालापासून दरवर्षी वातानुकुलित डब्यातून या बालकांसाठी मुंबई - गोवा सहल आयोजित करत असते. प्रवासादरम्यान कोकण रेल्वेतर्फे त्यांना विविध भेटवस्तू देण्यात येतात. पण, त्याचबरोबर प्रवासादरम्यान तसेच संपूर्ण सहलभर त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या रक्षकांनाही विविध सुविधा पुरविते. यावर्षीही मुंबईच्या टाटा मेमोरिअलमध्ये विविध टप्प्यांमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त बालकांसाठी कोकण रेल्वेने ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत सदिच्छा सहल आयोजित केली आहे. काल (दि. ५) ३८ मुले त्यांच्या काळजीवाहू आणि हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमसह मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून मंगलोर एक्सप्रेस (क्र. १२१३३) मधून ही सहल सुरू झाली आहे. ३ ते १६ वयोगटातील ही मुले कोकण रेल्वे मार्गावरील अनेक रमणीय दृश्ये पाहून हरखून जात आहेत. त्याच्या चेहऱ्यावरून हा आनंद ओतप्रोत ओसंडत असलेला दिसून येत आहे. ही सारी बालके लवकरच या व्याधीतून मुक्त होऊन त्यांना भविष्यात आनंद मिळो, अशी प्रार्थना कोकण रेल्वे परिवारातून करण्यात येत आहे. ही मुले ८ नोव्हेंबर रोजी मुंबईला परतणार आहेत. या उपक्रमाबाबत एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)८ रोजी परतणार मुंबईतकोकण रेल्वे परिवाराने दाखविलेल्या उत्साहाने कर्करूग्णांच्या जीवनात वेगळाच आनंद ३८ मुले सहभागीवैद्यकीयसुविधा उत्तम प्रकारे असल्याची दिली माहिती भविष्यात आनंद मिळेल