शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

जमिनींचा मोबदला जास्त द्या : भरत लब्धे

By admin | Updated: April 19, 2017 12:52 IST

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात संघर्ष समितीची मागणी

आॅनलाईन लोकमतशिरगाव (जि. रत्नागिरी),दि. १९ : गुहागर - विजापूर राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर करण्याच्या शासन निर्णयानंतर वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेण्याच्या उद्देशाने संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत लब्धे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता बामणे यांची भेट घेऊन चर्चा केली. या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे, पर्यटनदृष्ट्या काही ठिकाणे विकसित करावीत, या महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील, त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, अशी मागणी लब्धे यांनी केली. यावेळी पाटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती नाना गुरव, राजन कुलकर्णी, लियाकत कुठरेकर, प्रकाश लब्धे आदी उपस्थित होते. शासनाकडून राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मार्गालगतच्या रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. आपली रोजी-रोटी, आपले सर्वस्व आपण गमावून बसणार, आपणावर विस्थापित होण्याची वेळ येणार, अशी भीती सर्वांना वाटत होती. ध्रुव एजन्सी, पुणे यांच्याकडे या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम आहे. चर्चेवेळी एजन्सी प्रमुख मळेकर सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. मळेकर यांनी संपूर्ण नकाशासह शिष्टमंडळाला माहिती दिली. महामार्गासाठी रस्त्याचा पृष्ठभाग एकूण १० मीटर इतका असून, दोन्ही बाजूला २ मीटर साईडपट्टी व गटार अशी रचना आहे. या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. धोकादायक वळणे काढावीत, जेणेकरून अपघात होणार नाहीत. कुंभार्ली घाटामध्ये काही ठिकाणी तीव्र चढ व वळणे असल्यामुळे अवजड वाहने चढत नाहीत. परिणामी मध्येच रस्त्यात बंद पडतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक ठप्प होते, असे तीव्र चढ कमी करावेत, संपूर्ण घाट ते पोफळी, शिरगाव, सतीपर्यंत धोकादायक ठिकाणी मजबूत संरक्षक भिंती उभारण्यात याव्यात. ढाणकलजवळील धबधबा व काही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित करावीत, अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)