शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वाढदिवसाला संस्कार करणारी पुस्तके मुलांना द्या

By admin | Updated: December 12, 2014 23:52 IST

गोविंद गोडबोले : मुलांच्या भेटीतून सातत्याने मिळत गेली लिखाणाची उर्मी

रत्नागिरी : नाट्यछटांच्या स्पर्धा आयोजित करुन मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वाढदिवसाला हजारो रुपयांची भेट देताना त्यात लहान मुलांवर संस्कार करणारी पुस्तकेही भेट द्यावीत. मुलांना विचार करायला लावणाऱ्या व प्रबोधन करणाऱ्या बोली भाषेतील नाट्यछटांतून लेखिका अश्विनी आनंद पटवर्धन यांनी मुलात मूल होऊन लेखन केले आहे. त्यांनी हे व्रत असेच कायम जपावे, असे आवाहन बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी व्यक्त केले.ल. वि. केळकर सभागृहात लेखिका पटवर्धन यांच्या ‘पटवर्धनांच्या नाट्यछटा’ या पुस्तकाचे प्रकाशन गोडबोले तथा गोगो काकांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजेशखर मलुष्टे, माजी मुख्याध्यापक एच. डी. तथा बापूसाहेब जोशी, ग्रंथस्नेह प्रकाशनचे श्रीकृष्ण साबणे आणि अश्विनी पटवर्धन उपस्थित होत्या. अनुराधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.गोगोकाकांनी रत्नागिरीविषयी विशेष ऋण व्यक्त केले. रत्नागिरी आकाशवाणीवर काम करताना ‘अंगतपंगत’च्या माध्यमातून केलेल्या लेखनाला राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. आज चांगले व सुसंस्कारित श्रोते आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये साबणे यांनी सांगितले, ‘दत्त जयंतीला दीड तपापूर्वी ग्रंथस्नेहची स्थापना केली. त्यानंतर पुस्तक विक्रीपासून लेखक, कलाकार संवाद कार्यक्रम आयोजित केले. मुलांसाठी कथा, कविता, भाषणे, भारतरत्नांची माहिती आदी साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन व्यवसाय सुरु केला आहे. रत्नागिरीतील अनेक लेखकांना लिहिते करुन पुस्तके प्रकाशित करणार आहे.’पटवर्धन यांनी सांगितले, ‘नाट्यछटांचे हे दुसरे पुस्तक आहे. माझ्या मुलींसाठी आणि मैत्रिणींच्या मुलांना स्पर्धा किंवा स्नेहसंमेलनासाठी नव्या नाट्यछटा लिहून दिल्या. मुलांकडून अनेक विषय मिळाले. त्यांच्या निर्व्याज, निरागस आणि निखळ वागण्यातून विषय सुचले आणि लेखन केले.’ अ‍ॅड. मलुष्टे म्हणाले, ‘मुलांवर संस्कार करणारे लेखन हवे आहे.’ आजकाल ‘माणसे ही पैसा निर्माण करणारी यंत्रे’ झाली आहेत. मुलांवर संस्कार करण्यासाठी महिला मंडळाने कार्यरत व्हावे, असे आवाहन बापू जोशी यांनी केले. यावेळी कवयित्री सुनेत्रा जोशी, प्रणव दामले, दिनकर गोडबोले, रोहिणी म्हसकर, दया भिडे, वसुधा भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)