शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी किनारपट्टीच्या पोटात पुन्हा गोळा

By admin | Updated: July 16, 2016 23:30 IST

समुद्राला उधाण : पुढील तीन दिवसात मोठी भरती

रत्नागिरी : पौर्णिमेच्या ताणेला पावसाची व वादळी वाऱ्याची जोड उधाणलेल्या समुद्राला मिळाल्यास किनारपट्टीवासीयांसाठी ही भरती धोक्याची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, पौर्णिमेची रात्र येथील नागरिकांसाठी वैऱ्यांची ठरू शकते. येथील नागरिकांवर जागता पहारा ठेवण्याची वेळ येणार आहे. मंगळवारपासूनचे पुढील तीनही दिवस हे धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.गेले पंधरा दिवस किनारी भागात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असतानाच समुद्राच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे किनारी भागात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. अमावस्येच्या उधाणावेळी किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरले होते. त्यावेळी मिऱ्या भागामध्ये सर्तकतेचा इशारासुध्दा देण्यात आला होता. परंतु, पौणिमेच्या ताणेची भीती या लोकांचा मनात घर करून बसली आहे. ही भरती रात्रीची असल्याने या लोकांना जागता पहारा देण्याची वेळ आली आहे.अमावस्येचा भरतीवेळी मिऱ्या, काळबादेवी, मांडवी, पंधरामाड, राजीवडा, आदी भागांना उधाणाच्या भरतीचा चांगलाच तडाखा बसला होता. त्यावेळी १५ ते १६ फुटी लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. त्यामुळे पंधरामाड ते मिऱ्यापर्यंत असलेल्या बंधाऱ्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. तर काळबादेवी परिसरात स्मशानभूमीच उध्दवस्त होऊन वाळूमधून मानवी अवशेष बाहेर पडले होते. समुद्राचे पाणी गावात शिरण्यासही सुरुवात झाली होती. त्याचबरोबर पंधरामाड येथील २०० मीटरचा बंधारा समुद्राचा लाटांनी गिळंकृत केला होता. परंतु, आता येणाऱ्या भरतीमध्ये हा पूर्ण बंधारा नाहीसा होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे या परिसरात समुद्राचे पाणी घुसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, प्रशासन अजूनही याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.काही दिवसांपूर्वी पंधरामाड परिसराची प्रशासनाने पाहणी करून समुद्राच्या उधाणाच्या भीतीखाली असलेल्या १४ कुंटुबांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या होत्य परंतु, पर्यायी जागेअभावी स्थलांतर करणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला होता. परंतु, आता खऱ्या अर्थाने येथील नागरिकांसमोर पौर्णिमेच्या भरतीचे मोठे संकट उभे राहिले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्यासुध्दा अधिक आहे. त्यामुळे हे मच्छीमार समुद्रकिनारी आपले जीवन व्यतीत करतात. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांची संख्यासुध्दा जिल्ह्यात अधिक आहे. परंतु, आता या लोकांचा डोक्यावर पौर्णिमेच्या उधाणाचे सावट घोंघावत आहे. त्यात ही भरती पहाटेची असल्याने त्याला पावसाची व वादळी वाऱ्याची जोड मिळाली तर हे उधाण किनारपट्टीवासीयांसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)पौर्णिमेच्या भरतीचे सावटमंगळवारी पौर्णिमेची भरती असून, भरतीचा धोका मिऱ्यावासीयांसोबत समुद्रकिनारी राहणाऱ्या इतर गावांही बसण्याची शक्यता आहे. या भरतीला पावसाची जोड मिळाली तर ती सर्वात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस हे धोक्याचे असून, या दिवशी २.६० मीटर म्हणजेच १० ते १२ फुटाच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.एकामागोमाग संकटे; आता दर्श अमावस्या..मंगळवारी पौर्णिमेच्या भरतीच्या सावटाखाली किनारपट्टीवासीयांना राहावे लागत असून, एकामागोमाग एक संकटे येथील नागरिकांसमोर येत आहेत. आता या भरतीनंरत भीती असणार ती दर्श अमावस्येच्या उधाणाची. परंतु, कितीही संकटे आली तरी कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर न करण्याचा निर्णय या येथील नागरिकांनी घेतला आहे.अजस्त्र लाटांचा होणार मारा.किनारपट्टीवर उधाणाच्या भीतीचे सावट.पंधरामाड येथील बंधारा पूर्ण नाहीसा होण्याचा मार्गावर.द्यावा लागणार जागता पहारा.किनारपट्टीवासीयांवरील उधाणाच्या संकटांचा धोका कायम.पावसाची जोड मिळाल्यास उधाण धोक्याचे ठरण्याची शक्यता.