शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गॅस’मधील आंदोलन पेटणार?

By admin | Updated: March 18, 2015 23:59 IST

साखळी उपोषण : प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात आता ग्रामस्थांचाही सहभाग

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सी अ‍ॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २३ मार्चपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. एन्रॉन प्रकल्पग्रस्त असलेले यशवंत बाईत व ग्रामस्थही या उपोषणात सहभागी होणार असल्याचे, रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या नावे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पासाठी म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी अंजनवेल, कातळवाडी, वेलदूर, घरटवाडी व रानवी (गुहागर) येथील सुमारे ६१० हेक्टर जमिन शासनाने संपादित केली आहे. या संपादित जमिनीत यशवंत सोनू बाईत यांची १४ एकर जमीन समाविष्ट आहे. प्रकल्पात कामगार भरती करण्यासाठी मा. मुुंबई उच्च न्यायालयाने व रीट पिटीशन २७३५/९४ मधील काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.कंपनीकडून या सुचनांचा आदर करुन कामगार भरती केली जात नाहीच, परंतु जे कामगार आपल्या कंपनीत कामाला आहेत त्यांच्यावरही आपल्या कंपनीचे अधिकारी युटिलीटी पॉवर टेक लि. चे अधिकारी व सब ठेकेदार मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करत आहेत. याविषयी बैठक घेऊन चर्चा करण्यासाठी प्रकल्पस्थळावरच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन तसेच लेखी पत्र देऊनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही. जिल्हाधिकारी यानीही संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चर्चा करण्याचे व सूचना करुनही याची दखल घेतली गेली नाही.अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून सोमवार २३ मार्चला कामगार उपोषण करणार आहेत. यासाठी अंजनवेल ग्रामस्थही सहभागी होणार असल्याचे यशवंत बाईत यांनी निवेदनात म्हटले आहे.यशवंत बाईत यांनी एन्रॉन विरोधी लोकहक्क समितीचे प्रमुख म्हणून कंपनीमधील प्रकल्पग्रस्तांचे अनेक अन्यायग्रस्त विषय हाताळून न्याय मिळवून दिला आहे. तसेच गुहागर तालुका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान अंजनवेल ग्रामपंचायतीचे सरपंच असल्याने उपोषणामध्ये यशवंत बाईत यांच्यासह ग्रामस्थही सहभागी होणार असल्याने हा उपोषणाचा लढा अधिक तीव्र होणार आहे. (प्रतिनिधी)आता आक्रमक होणार...रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पासाठी अंजनवेल, कातळवाडी, वेलदूर, घरटवाडी व रानवी (गुहागर) येथील सुमारे ६१० हेक्टर जमीन संपादित.कंपनीतील कामगारांवर बेकारीची टांगती तलवार.अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक .