शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळेत भाविक, पर्यटकांचा सागर

By admin | Updated: May 24, 2016 00:49 IST

हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल : पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात

गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात हंगामी सुटीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र, येथील सुर्वे स्टॉप, कोल्हटकर तिठा आदी ठिकाणी दिवसातून अनेकवेळा वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. वाहतुकीची कोंडी होत असतानाच त्यावर येथील स्थानिक पोलीस तसेच पोलीस मुख्यालयातून बंदोबस्तासाठी आलेले पोलीस योग्य रितीने वाहतूक हाताळताना दिसत आहेत. ग्रामपंचातीकडून सागरदर्शन पार्किंग येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. लक्झरी, टेम्पो ट्रॅव्हलर, सुमो, एस. टी. बसेस, ट्रक व इतर चार चाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आपटा तिठा ते मोरया चौक या रस्त्यावर एका बाजूला पार्किंग करण्यात आले असून, मोरया चौक ते कोल्हटकर तिठा या रस्त्यावरही रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक मेहनत घेत आहेत. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गर्दीच्या वेळी येथील जयगड पोलीस स्थानकातून बंदोबस्त मागवला जातो. यावेळी सुमारे १० ते १५ पोलीस कर्मचारीही दिले जातात. सध्या कार्यरत असलेले पोलीस कर्मचारीही मोठी मेहनत घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवताना दिसतात. मात्र, गर्दीच्या वेळी सुमारे चार वाहतूक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दिल्यास वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत होईल, असे बोलले जात आहे.गणपतीपुळे संस्थानकडून कायमस्वरुपी दर्शनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या दर्शनलाईनमधून योग्य पद्धतीने भाविक दर्शन घेताना दिसून येत आहे. रांगेतून योग्य पद्धतीने दर्शन घेता येत असल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. समुद्रचौपाटीवर समुद्राच्या पाण्यात अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, टेहळणी मनोऱ्यावरुन लक्षही ठेवण्यात येत आहे.दि. १ ते १९ मे या कालावधीत येथे फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अचानक गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. गेले तीन दिवस गणपतीपुळे परिसरातले सर्व लॉज फुल्ल झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी खोल्या शिल्लक नाहीत, अशा प्रकारचे बोर्ड लागल्याचे दिसून येत आहे. वाढणारा उष्मा यामुळे सध्या लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे आदी थंड सरबतांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)