शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळेत तोतया दिग्दर्शकाला अटक

By admin | Updated: April 29, 2016 00:21 IST

गोव्यातील फरार आरोपी : फसवणुकीचा आकडा लाखोंवर जाण्याची शक्यता

रत्नागिरी / गणपतीपुळे : मुलाला अ‍ॅग्रो प्रॉडक्टची जाहिरात देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या तोतया दिग्दर्शक संदीप पाटील याला गणपतीपुळे येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, हा संशयित वेगवेगळ्या नावाने लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.उदय गोविंद सावंत (मुंबई गोरेगाव) यांची संदीप पाटील याच्याशी ओळख व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून झाली. त्यामुळे संदीप हा एक आठवड्यापासून त्यांच्या संपर्कात होता. संदीप पाटील ऊर्फ सँडी याने तुमच्या १० वर्षाच्या मुलाला जाहिरातीत काम देतो. त्यासाठी दहा हजार रुपये द्या, असे सांगून सावंत यांना रत्नागिरी येथे बोलावून घेतले. त्यानुसार ते बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले.संदीप पाटील याने सावंत यांना आणण्यासाठी आपली इनोव्हा गाडी (एमएच-०६-५३९८) पाठविली. (पान १ वरून) दरम्यान, आपला मुलगा सोहम सावंत याला घेऊन ते कोहिनूर हॉटेल येथे गेले. तेथे संदीप याला त्यांनी १० हजार रुपये दिले. त्यावेळी संदीप याने सोहम याचे फोटोशूट करून शुटिंगला २८ एप्रिलपासून सुरुवात करू, असे सांगून त्यांची पाठवणी केली. मात्र, तसे काही झाले नाही. उलट कोहिनूर हॉटेलचे पैसे देखील त्याने बुडविले. याबाबत तत्काळ शहर पोलिस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी संदीपविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरीत उदय सावंत यांची फसवणूक करून संशयित संदीप याने थेट गणपतीपुळे येथे संदीप व्हरांबळे या नावाने अभिषेक हॉटेल गाठले. तेथे आपल्याला २० रूम पाहिजे असल्याचे त्याने व्यवस्थापकाला सांगितले; परंतु त्याच्याकडे कोणतेही साहित्य नसल्याने तेथील व्यवस्थापकाला त्याचा संशय आला. त्यांनी त्याचे ओळखपत्र पाहून त्याबाबत इंटरनेटवर माहिती घेतली. त्यावेळी तो गोव्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.आपल्याबाबत व्यवस्थापकाला माहिती कळल्याचे लक्षात येताच संदीपने जंगलात पोबारा केला; परंतु पोलिसांनी त्याला काही तासातच जेरबंद केले. संदीप पाटील हा गेल्या वीस दिवसांपासून कोहिनूर येथे वास्तव्यास होता. याठिकाणी तो नवनवीन मुली हॉटेलमध्ये आणायचा, अशी चर्चा गणपतीपुळे परिसरात सुरू आहे. याबाबत संदीप पाटील उर्फ सँडी ऊर्फ संदीप व्हरांबळे असे नाव सांगणाऱ्या या तोतया फिल्म डायरेक्टरच्या विरोधात शहर पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)मुलींचे अनेक फोटोसंदीप पाटील याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो असून तो या मुलीचा अनैतिक धंद्यासाठी वापर करीत असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या गाठोड्यात महिलाचे ड्रेस, कंडोम आदी सहित्य सापडले असून यावरून तो अश्लील कारनामे करत असल्याची चर्चा गणपतीपुळ्यात चालू आहे.