शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़ धरणाची संचय क्षमता १२६.१५ मीटर असून, पाणी पातळी १२१.२० ...

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़ धरणाची संचय क्षमता १२६.१५ मीटर असून, पाणी पातळी १२१.२० मीटर एवढी आहे़ ०५ सेंमी उंचीने पाणी वाहत असून, विसर्ग ४१.०९२ घनमीटर आहे़ गडनदी धरणातून १८ जून रोजी सकाळी ११ वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहिती गडनदी प्रकल्प कुचांबे उपविभागाचे उपविभागीय अभियंता संजय सोनावणे यांनी दिली. शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरु नये व स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन राजीवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी यावेळी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहत आहे़ धरणात क्षमतापूर्ण पाणीसाठा झाला असून, सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे़ त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे़, तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून, ११ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर एकूण ५७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे गडनदी धरण पाहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरु नये़, तसेच सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता संजय सोनावणे यांनी केले आहे.