असगोली : गुहागर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर रस्ते व पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. गेल्या अडीच वर्षात शहरातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रहदारीच्या रस्त्याला पर्यायी मार्ग निर्माण करण्याचे नगरपंचायतीने निश्चित केले आहे. यामुळे रस्ते विकासाला चालना देण्यात येणार आहे.गुहागर व असगोलीतील अंतर्गत पाखाड्या सक्षम करण्याबरोबरच प्रत्येक वाडीतील छोटे रस्ते हे मुख्य रस्त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच खालचापाट जांगळेवाडी ते कीर्तनवाडी या कालव्याशेजारुन रस्ता गेल्याने येथील जागांचा दरही वाढला आहे. अनेकांनी येथे निवासस्थाने बांधण्यास सुरुवात देखील केली आहे. यामुळे शहराच्या दक्षिण व पूर्व भागातील वस्तीचा विस्तार होत आहे. जांगळेवाडी ते कीर्तनवाडी रस्त्यामुळे बाजारपेठेतील वाहनांची वर्दळ ही खालचापाट व असगोलीकडे जाणाऱ्या वाहनांना मिळणार नसल्याने हा रस्ताही तितकाच महत्त्वाचा आहे.तसेच शिवाजी चौक ते एच. पी. गॅसपर्यंतच्या नव्या रस्त्यामुळे गुहागर - चिपळूण मार्गावरील शासकीय विश्रामगृह ते शिवाजी चौकपर्यंतच्या डोंगरउतारावरील वाहतुकीला पर्यायी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव वाढणार आहेत. मोडकाआगर धरणाच्या मुख्य भिंतीकडे जाणाऱ्या रस्त्याचाही शुभारंभ झाल्याने धरणाच्या भिंतीजवळील निसर्गसौंदर्य आता पाहता येणार आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जागाही विकसित होणार आहेत. (वार्ताहर)ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर निधी उपलब्ध.$$्मिुख्य रहदारीच्या रस्त्याला पर्यायी मार्ग निर्माण करणार.छोटे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडण्याचा प्रयत्न.मोडकाआगर धरणाजवळील निसर्गसौंदर्य पाहण्याची पर्यटकांना संधी.
गुहागरात रस्ते विकासासाठी तब्बल अडीच वर्षांनी निधी
By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST