शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही मंत्रीपदासाठी निराशाच

By admin | Updated: July 19, 2016 23:56 IST

नीलेश राणे : शिवसेनेच्या आमदारांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका, पक्षवाढीसाठी २४पासून जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यातील सेनेच्या तीनपैकी एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. ‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही काही जणांची घोर निराशा झाली. पक्षाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांची पात्रता काय हेच त्यांना दाखवून आहे, या शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांची खिल्ली उडवली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे रत्नागिरीत आले होते. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील कॉँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी येत्या २४ जुलैपासून जिल्ह्यात तालुकानिहाय पक्ष संघटनेच्या बैठका, मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसचा महामेळावा घेतला जाणार आहे. २४ जुलै रोजी राजापूर येथून मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. जिल्हाध्यक्ष पद लवकरच भरले जाईल, असे ते म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण डिसेंबर २०१६मध्ये पूर्ण होईल, असे सांगितले होते. आजची स्थिती पाहिली तर चौपदरीकरणाबाबत नियोजनच नसल्याचे स्पष्ट होत आहे. वळणे तशीच ठेवून चौपदरीकरण केल्याने काय साधणार, असा सवालही त्यांनी केला. भरपाईबाबतही स्पष्टपणे काहीच सांगितले जात नाही. बंदरांचा विकास व वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार असल्याचे बुडबुडे काहीजण हवेत उडवत आहेत. नवीन कपडे शिवले की, ते दाखवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर रत्नागिरीत येतात. बाकी काहीच काम ते करीत नाहीत. केवळ आश्वासने देतात, अशी टीका त्यांनी केली.जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्वच योजनांमध्ये कोण व किती लाभार्थी आहेत, याची माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन या भ्रष्टाचाराचाही पर्दाफाश करणार असल्याचे राणे म्हणाले. आम्ही राज्यराणी गाडी सुरू केली. त्यानंतर एकही गाडी कोकणला मिळाली नाही. थांबे, स्थानके वाढवणे म्हणजे मोठे काम झाले, असे नाही, असा टोलाही त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना लगावला. (प्रतिनिधी)मेटेंनी मंत्रीपदाची भीक मागू नयेविनायक मेटे हे मंत्रीपदासाठी हातात वाटी घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर उभे आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यांचा स्वाभिमान गेला कुठे? मराठा समाजाला हे शोभणारे नाही. मेटे यांनी अशा मंत्रीपदाला लाथ मारावी. मंत्रीपदाची भीक मागू नये. त्यांनी मराठ्यांचे नेतृत्व करावे. आम्हीही त्यांच्याबरोबर येऊ, असे राणे म्हणाले.केसरकरांनी आधी एक हवालदार सांभाळावा...गृहराज्यमंत्रीपद मिळालेल्या सेनेच्या दीपक केसरकर यांच्यावर नीलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. हाफ चड्डीतील एक हवालदारही सांभाळू न शकणाऱ्या माणसाला गृहराज्यमंत्रीपद दिले गेले आहे. आधी केसरकर यांनी एक हवालदार सांभाळून दाखवावा, एक पोलीस चौकी सांभाळून दाखवावी, असेही ते म्हणाले. सामंत मातोश्रीबाहेर घुटमळत होते... मंत्रीपदाच्या आशेने आमदार उदय सामंत हे मातोश्रीच्या बाहेर घुटमळत होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांची घोर निराशाच झाली, असे राणे म्हणाले. टॉप टेन खासदारांमध्ये विनायक राऊत यांचे नाव एका संस्थेने नमूद केल्याचे निदर्शनास आणताच असे करणाऱ्या या संस्थेचीच माहिती घ्यावी लागेल, असेही राणे म्हणाले.जाधवांबरोबरचे गैरसमज संपले...येत्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झालीच पाहिजे, अशी आपली इच्छा असल्याचे राणे यांनी सांगताच भास्कर जाधवांबरोबच्या वैराचे काय, असे विचारता भास्कर जाधव यांच्याशी आपले व्यक्तीगत कोणतेही वैर नाही. संदीप सावंत नावाच्या माणसामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले होते. ते संपले आहेत, असे ते म्हणाले.