शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस्अ‍ॅपमुळे चाळीस वर्षांनी भेटले मित्र

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

व्हॉटस्अपच्या माध्यमातून सगळे एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन साजरे झाले. नुसतंच संमेलन झालं नाही तर त्यांनी तब्बल दोन लाख रूपयांची देणगीही आपल्या शाळेला

रत्नागिरी : सगळेचजण वयाची ५५ वर्षे ओलांडलेले. आता त्यांची नातवंड शाळकरी वयाची. सगळ्यांमधला समन्वयाचा धागा एकच... फाटक प्रशालेच्या १९७३-७४ या वर्षातील अकरावी ‘अ’ची बॅच... नोकरी-व्यवसाय, कुटुंबासाठी म्हणून इतरत्र विखुरलेले... तब्बल ४० वर्ष लोटली होती. पण व्हॉटस्अपच्या माध्यमातून सगळे एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन साजरे झाले. नुसतंच संमेलन झालं नाही तर त्यांनी तब्बल दोन लाख रूपयांची देणगीही आपल्या शाळेला दिली.डॉ. राज शेरे यांनी व्हॉटस्अपव्दारे गु्रप तयार केला. संतोष देसाई व अंजली गोरे यांच्या मदतीने बहुतांश वर्गमित्रांचा एक ग्रुप तयार झाला. संबंधितांनी यथाशक्ती रक्कम गोळा केली. त्यातून दोन लाख रूपये जमा झाले. पैकी एक लाखाची देणगी वर्गमित्र व सध्याचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. वसंत जोशी यांच्याकडे सुपुर्द केली गेली. शनिवारी सर्व मंडळी नियोजनाप्रमाणे मारूती मंदिर येथे एकत्र आली. तेथून गणपतीपुळेपर्यंत छोटी सहल काढण्यात आली. संध्याकाळी ७ वाजता सर्व मंडळी हातखंबा येथे पुन्हा एकत्र जमली. मृत मित्रांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्नेहसंमेलनासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. रत्नागिरीत फाटक प्रशालेत शिक्षण घेताना आलेले अनुभव, मिळालेली ज्ञानाची शिदोरी, पुढील वाटचाल यासारख्या गोष्टींना उजाळा देण्यात आला.रविवारी सकाळी सर्व मंडळी फाटक प्रशालेत एकत्र जमली. अकरावी ‘अ’च्या वर्गात बसून आठवणींना उजाळा दिला. डॉ. एम. एम जोशी व बाळ सर यांचा चांदीचे नाणे, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. वसंत जोशी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. पावसपर्यंत छोटी सहल काढून निरोप समारंभ हातखंबा येथे पार पडला. सर्व वर्ग मित्रांना स्मृतीचिन्हे व भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संतोष देसाई, राज शेरे, जयंत भिडे, केशव भट, अंजली गोरे, प्रकाश लेले, गणेश नानिवडेकर, डॉ. वसंत जोशी यांनी केले होते. त्यांना त्याच्या वर्गमित्र सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. (प्रतिनिधी)