शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांनी जिल्ह्याला वेतन पथक अधीक्षक

By admin | Updated: June 6, 2016 00:42 IST

संघटनेच्या मागणीला यश : पी. बी. पाटील नियुक्त

टेंभ्ये : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकपदी तब्बल चार वर्षाने पूर्णवेळ अधीक्षक रुजू झाले आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. बी. पाटील यांची माध्यमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. जिल्ह्याला पूर्णवेळ वेतन पथक अधीक्षक मिळावा, यासाठी माध्यमिक शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले होते. यामुळे सध्या वेतन व भविष्य निर्वाह निधी संदर्भातील प्रलंबित कामांना गती प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.माध्यमिक वेतन पथक अधीक्षकपद जून २०१२ पासून रिक्त होते. या पदावर प्रशासनाकडून तीन प्रभारी अधिकाऱ्यांची चार वर्षांच्या कालावधीत नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये शुभांगी चव्हाण, उमेश मगदूम, संतोष कटाळे यांचा समावेश आहे. यापूर्वी सन २००८ ते २०१२ या कालावधीत विद्यमान अधीक्षक पी. बी. पाटील हेच या पदावर कार्यरत होते. या काळामध्ये त्यांनी घेतलेले फंड कँप, पेन्शन डे, मुख्याध्यापक, शिक्षक व लिपीकांच्या कार्यशाळा यामुळे जिल्ह्यात पाटील हे सुपरिचित आहेत. सध्या वेतन पथकाकडून सन २०१३ पासूनच्या फंड स्लिपा वितरीत करणे प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर महिन्याच्या १ तारखेला पगार जमा करणे हे आव्हानात्मक काम नूतन अधीक्षकांसमोर असणार आहे. (वार्ताहर)पी. बी. पाटील : पारदर्शक, गतीमान कामकाजाला महत्वरत्नागिरी जिल्ह्यामध्ये यापूर्वी अनेक वर्षे काम केले आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांचे अत्यंत चांगले सहकार्य मिळते. पूर्वीप्रमाणेच पारदर्शक व गतीमान कामकाजाला प्राधान्य देणार. वेतन पथकाच्या सर्व प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसेच शिक्षक - कर्मचाऱ्यांचा पगार १ तारखेला त्यांच्या खात्यावर जमा होईल. यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे नूतन वेतन पथक अधीक्षक पी. बी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.निधीचा निपटारावेतन पथक अधीक्षकपद रिक्त असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी संदर्भातील प्रश्न निर्माण झाले होते. या पदावर कायमस्वरूपी अधीक्षक मिळाल्याने वेतन व भविष्य निर्वाह निधीचा निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे.